Hero
Hero 
युथ्स-कॉर्नर

दिल तो बच्चा है! : हिरो होणे महत्वाचे!

नितीन थोरात

बरोबर एक महिना घरातून बाहेर पडलेलो नाही. लॉकडाउन पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न केला. काहीही झालं तरी आपल्या घरात कोरोना येणार नाही, याची काळजी घेतली. दुधाची पिशवी आणली, तरी आधी डेटॉलमध्ये भिजत ठेवली. भाजीपाला आणला, तरी तोही पूर्ण स्वच्छ केला. किराणा आणल्यावर लगेच त्यावर डेटॉल फवारले. घरातून बाहेर जाताना तोंडाला मास्क लावले. घरात आलो, की हात धुवायचा. दर अर्ध्या तासाने घरातच हाताला सॅनिटायझर लावायचे, असा दिनक्रम ठरलेला. त्यामुळं शेजारच्या घरात कोरोना आला, तरी आपल्या घरात येणार नाही, याची खात्री वाटत होती. कोरोनाविरुद्ध लढणारा घरातला हिरो होतो मी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, एका पंचतारांकित हॉस्पिटलच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला, ‘नित्या, आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे दोन पेशंट ॲडमिट झालेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या ब्लडचं सॅम्पल मीच टेस्ट केलं.’ दोस्ताचा अभिमान वाटू लागला. तो हिरो वाटू लागला. आता मलाही हिरो व्हायचं होतं. काय करावं कळेना. इतक्‍यात तो म्हणाला, ‘अरे, भविष्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होणारहे. प्लीज तू रक्तदान कर आणि सोशल मीडियावर आवाहन कर. फेसबुकवर तुला बरेचजण फॉलो करतात. नक्कीच लोक रक्तदान करतील.’ 

एकदम योग्य वेळी मित्राने मला हिरो होण्याची संधी दिली आणि मी त्याचं सोनं केलं. कोरोनाची कसलीही भिती न बाळगता कमालीच्या जोशात त्याच्याच हॉस्पिटलला जाऊन रक्तदान केलं. तशी फेसबुकवर पोस्टही टाकली. आपण आता सोशल मीडियावरही हिरो आहोत, असं फील होऊ लागलं. फेसबुकवर लोकांनी कौतुक केलं. ऊर अभिमानानं भरून आला. जिथं कोरोना पेंशट आहेत तिथंच जाऊन रक्तदान केल्यानं सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखं वाटत होतं. 

आपण नाय भेत कोरोनाला, असं वाटत असतानाच वडिलांची तब्येत बिघडली. छोट्या मोठ्या दवाखान्यानंही फरक पडेना. एमआरआय सीटीस्कॅन करावं लागेल, असं डॉक्‍टर म्हणू लागले आणि मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलशिवाय दुसरा पर्याय दिसेना. यावेळी मात्र हॉस्पिटलला जायची भिती वाटू लागली. रक्तदान करायला ज्या हॉस्पिटलला जाताना हिरो असल्याचा फिल येत होता, त्याच हॉस्पिटलला वडिलांना घेऊन जाताना पाय लटलट कापू लागले. 

रक्तदान करून मी किती चांगला आहे, हे समाजासमोर मांडता येणार होतं. रक्तदान करून मला समाजाला उपदेशाचे ढोस पाजता येणार होते. चार लोकं माझं कौतुक करणार होते. समाजात आणि सोशल मीडियावर माझी इमेज वाढणार होती. मी हिरो होणार होतो. पण, वडिलांना दवाखान्यात नेऊन यातलं काय मिळणार हा प्रश्‍न होता. पण, मीही हुशार. कोरोनाचं संकट असतानाही मी माझ्या बापाला दवाखान्यात घेऊन आलो, अशी बातमी सगळ्या पाहुण्यारावळ्यांमध्ये पसरवली आणि सगळे पाहुणेरावळे फोन करून माझं कौतुक करू लागले. बघा लेकाला किती बापाची काळजी आहे, असं म्हणू लागले. पुन्हा एकदा ऊर अभिमानानं भरून आला. घरात काळजी घेऊन घरात हिरो झालतो. रक्तदान करून सोशल मीडियात हिरो झालो.

कोरोनाच्या संकटात वडिलांचा दवाखाना करतोय, असं म्हणून पाहुण्यांमध्येही हिरो झालो. शेवटी हिरो होणं महत्त्वाचं. मग, भलेही आपल्याला जग कसं हे शिकवणारा आपला बाप मृत्यूशी झुंजत का असेना, हिरो होणं महत्त्वाचं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT