Mansi-and-Pradip
Mansi-and-Pradip 
युथ्स-कॉर्नर

लग्नाची गोष्ट : मानसीचा ‘बॉक्सिंग’वाला!

मानसी नाईक, प्रदीप खरेरा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईकनं नुकतीच प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली आहे. फेब्रुवारी २०२०मध्ये मानसीनं प्रदीपसोबतचं आपलं नातं सर्वांसमोर आणलं आणि नुकताच त्यांचा संसार सुरू होऊन एक महिना झाला आहे. मानसीचा नवरा प्रदीप खरेरा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तो अभिनय व मॉडलिंगदेखील करतो. प्रदीपचा त्याच्या आयुष्यातील फोकस पाहून मानसीनं त्याला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं. 

मानसी म्हणाली, ‘मी पुण्याची, ते हरियानाचे. त्यामुळं आता मला एक वेगळी आणि छान संस्कृती जवळून अनुभवायला मिळत आहे. याशिवाय मी कला क्षेत्रात काम करणारी मुलगी, तर त्यांनी स्पोर्ट्स फिल्डमध्ये आपलं नाव कमावलं आहे. अनेक बॉक्सिंगच्या स्पर्धांत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. प्रदीप खूप गोड आणि प्रेमळ आहेत. त्यांच्याशी बोलताना ते किती कडक बोलतात असं वाटतं, पण त्या बोलण्यात प्रेम असतं, जिव्हाळा असतो. ते खूप समजूतदार आहेत, समोरच्याची खूप काळजी घेतात; असा त्यांचा स्वभाव आहे. आपल्यात जे गुण नाहीत, ते आपल्या जोडीदारामध्ये असलं की ते नातं आणखी फुलतं. आमच्या बाबतीत अगदी तसंच झालं आहे. मी अगदी चुलबुली आहे, तर ते अगदी शांत आणि संयमी. त्यांनी मला आयुष्यात संयम बाळगायला शिकवला, शांतपणे विचार करून बोलावं, विचारपूर्वक पावलं टाकावीत या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकत आहे.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रदीपही मानसीबद्दल भरभरून बोलला. तो म्हणाला, ‘‘मानसी खूप मनमिळाऊ मुलगी आहे. सर्वांना ती आपलंस करून घेते. कोणत्याही गोष्टीकडं ती सकारात्मक नजरेतून बघते. आम्ही नवरा-बायको आहोत, पण त्या पलीकडं जाऊन एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत. आमच्यातलं बॉण्डिंग इतकं घट्ट आहे, की मी न सांगताच तिला कळतं मला काय म्हणायचं आहे किंवा मला काय हवं आहे. त्यामुळं अनेकदा माझ्या एखादा आवडीचा पदार्थ मी न सांगताच तिनं आधी बनवून ठेवलेला असतो. ती खूप छान स्वयंपाक करते. मला तिच्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात. तिला नेहमी प्रेसेंटेबल राहायला आवडतं. शिवाय ती उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिच्यातले हे दोन गुण मला आत्मसात करायला नक्कीच आवडतील.’’

या जोडीने आपल्या चाहत्यांना नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे या दोघांवर चित्रित झालेलं ‘वाटेवरी मोगरा’ हे नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, मानसीचं हे पहिलंच रोमँटिक गाणं आहे, तर या गाण्याच्या माध्यमातून प्रदीप मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करीत आहे. सागरिका म्युझिकचं हे गाणं स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे, नीलेश मोहरीर यानं या गाण्याला संगीत दिलं आहे. हे गाणं शूट करण्याचा दोघांचाही अनुभव खूप खास होता. दोघांनीही या गाण्याचं शूटिंग एन्जॉय केलं. या सगळ्या कालावधीत या गाण्याची संपूर्ण टीम एक फॅमिली बनली, असेही दोघं म्हणाले. या गाण्यासाठी दोघंही फार उत्सुक आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येणाऱ्या मानसी आणि प्रदीपच्या जोडीला प्रेक्षकांकडूनही तितकेच प्रेम मिळत आहे.

(शब्दांकन - राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीमध्ये आज दोन सभा

SCROLL FOR NEXT