युथ्स-कॉर्नर

नवीन पिढीने व्यवसायात झोकून द्यावे यश निश्चितच जवळ येईल ;उद्योजक विलास चोरगे

टीम YIN युवा

मुंबई: नवीन पिढी पिढीने व्यवसायाकडे वळले पाहिजे एखादा व्यवसाय करताना त्या व्यवसायावर पूर्णपणे झोकून द्यावे, त्यातून तुम्हाला यश निश्चितच मिळेल, असे आवाहन हॉटेल व्यावसायिक व उद्योजक विलास चोरगे यांनी यिन अधिवेशनात केले.

यिन अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात ते "आम्ही उद्योजक घडलो आणि इतरांना उद्योजक घडवले कसे?"या विषयावर ते बोलत होते.

चोरगे यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात ही पानफुले विकत पन्नास पैशापासून केली होती आणि मंदिराच्या समोर पान फुलांचा वाटा वाटत साडेतीन रुपये सुरुवातीला कसे कमावले होते याचे अनुभव यावेळी सांगितले.

आज आपण व्यावसायिक म्हणून मोठे झालो असलो तरी त्यामध्ये व्यवसायाचा खरा दृष्टिकोन हे आपल्याला आईपासून मिळाला तिच्या दूरदृष्टीपणामुळेच मी घडलो असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली. शिक्षण सुरू असतानाच पुण्यामध्ये आपण आमलेट भुर्जी पावची हातगाडी सुरू केली होती. त्यावेळी सुरुवातीला आठ ते दहा रुपयाचा धंदा व्हायचा. पुढे डेक्कन परिसरामध्ये ज्यूसबार, पावभाजी सुरू केली आणि पावभाजी ग्राहकांना कशी द्यायची हे आम्ही त्यावेळी शिकवले. पुढे हॉटेल व्यवसायिक म्हणून मी नावारूपाला आलो. प्रत्येक वेळी ग्राहकांना चांगले खायला घालायचे त्यासोबत त्याला देण्यात येणारी सेवा, स्वच्छता आणि प्रत्येक वेळी दर्जाला प्राधान्य कसे द्यायचे हा माझ्या व्यवसायातला अत्यंत महत्त्वाचा भाग होता. 1996 ला पुण्यात मी जंजिरा नावाचे हॉटेल आणले आणि पहिले सीफूड त्या माध्यमातून सुरू केले. आज पुण्यात पाच ते सहा ब्रँड आमच्या नावाने कार्यरत आहेत आम्ही जे काही करतो ते पारदर्शक असते. त्यात दर्जा यासाठी कुठेही कमी पडत नाही. दर्जेदार व्यवसाय करणे यावर आमचा फोकस असतो. येत्या काळात मुळशी येथे मी रिसॉर्ट सुरू करतोय. तेही नवीन आणि दर्जेदार असेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आपण व्यवसाय करताना समाजाशीही काही देणं लागत. या गोष्टीचे भान आपण कायमच ठेवले पाहिजे. त्यामुळेच मी माझ्यासोबत असलेल्या अनेक कामगारांना आज उद्योजक बनवले आहे. पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणी दिसून अधिक मुले आज हॉटेल चालवत आहेत त्यांना मी ते हॉटेलसुरू करून दिल्याने आज ते उद्योजक बनले आहेत. मी मोठा होण्यामध्ये माझ्या सर्व मंडळीचा तितकाच वाटा आहे. कामगाराला कायमच बरोबर घेऊन जाणे त्यांच्या अडीअडचणीला मदत करणे, यावरही माझा फोकस असतो मी ज्या शाळेत मंदिराच्या फरशीवर बसून शिकलो होतो. त्या शाळेला आज मला बॅचेस देता आले. विविध सामाजिक उपक्रमातून वृक्ष लागवड, शाळांना मदती अधिक काम करत असतो. परंतु एखादा व्यवसाय करताना प्रत्येकाने खोलात जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी झोकून दिले पाहिजे. तरच आपल्याला यश निश्चित मिळेल. त्यासाठी तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे असे आवाहनही चोरगे यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT