आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

मुंबई : खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा आज (गुरुवार) राजीनामा दिला आहे. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर केला असून, त्यांना बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केले जात आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

मुंबई : खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा आज (गुरुवार) राजीनामा दिला आहे. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर केला असून, त्यांना बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केले जात आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

चंदा कोचर यांनी बँकेतून लवकर निवृत्ती घेतली असून, बॅंकेनेही त्यांची निवृत्ती स्विकारली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने चंदा कोचर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोचर यांच्याजागेवर संदीप बक्षी असणार आहेत. संदीप बक्षी यांना पाच वर्षांसाठी हे पद देण्यात आले आहे. चंदा कोचर यांच्याविरोधात व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोचर सध्या सक्तीच्या रजेवर होत्या. चंदा कोचर यांची चौकशी यापुढेही सुरुच राहणार आहे, अशी माहिती बॅंकेने दिली. चंदा कोचर यांच्या राजीनामाच्या वृत्तानंतर आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली. बँकेचे शेअर तीन टक्क्यांनी वाढून 313 रुपयांवर पोहोचले.

व्हिडीओकॉन समूह तसेच नूपॉवर कंपनीला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3,250 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे नूपॉवरचे अध्यक्ष आहेत. या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाची 64 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. पतीशी संबंधित कंपनीला कर्ज वितरणात प्राधान्य दिल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे.

चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या नेतृत्त्वात आयसीआयसीआय बोर्डाने व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली आहे. श्रीकृष्ण हे अर्थव्यवहाराचे जाणकार असल्याने ते याप्रकरणाची काटेकोर तपासणी करतील, असा विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chanda Kochhar quits ICICI Bank and Sandeep Bakhshi appointed new ceo