काळ्या पैशांविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राइक'

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक निर्णय; रु. 500, 1000 इतिहासजमा; रु.2000 ची नव्याने 'एंट्री'

नवी दिल्ली : काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून (ता. 8) चलनातून बंद करण्यात आल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केला.

दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ही अतिमहत्त्वाची घोषणा केली. यातील एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येतील. तसेच दोन हजार रुपयांची नोटही चलनात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने काळ्या पैशांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले होते. मोदी यांचा आजचा निर्णय म्हणजे त्याचेच फलित मानावे लागेल. सरकारने काळ्या पैशांविरुद्ध केलेला हा "सर्जिकल स्ट्राइक' मानला जातो. पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून जाणार असल्या आणि हजार रुपयांच्या नोटा कायमच्या रद्द होणार असल्या, तरी टपाल कार्यालये आणि बॅंकांमधून ग्राहकांना त्या बदलून मिळतील.

Web Title: currency notes of 500 and 1000 to be discontinued- narendra modi