Flashback 2019: भारतात कोण उद्योगपती झाला वर्षभरात मालामाल?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

समभाग वधारल्याचा फायदा
चालू वर्षी रिलाइन्स इंडस्ट्रीज लि.चे समभाग 40 टक्‍क्‍यांची वधारल्यामुळे त्याचा फायदा अंबानी यांना झाला आहे. तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स या मूळ उद्योगांपेक्षा रिलायन्सने सध्या ग्राहक सेवा क्षेत्रांवर भर दिला आहे. गुंतवणूकदारांची रिलायन्सला मोठी पसंती आहे. त्यातही कंपनीच्या दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रातील रिलायन्सच्या कंपन्यांना सर्वाधिक मागणी आहे.

फ्लॅशबॅक 2019 - आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी सरते वर्षे कमालीचे फायदेशीर ठरले. 23 डिसेंबरपर्यंत अंबानी यांच्या संपत्तीत सुमारे 17 अब्ज डॉलरची भर पडली असून, याबाबतीत त्यांनी जॅक मा आणि जेफ बेझोस यांच्यावरही आघाडी घेतली. 2019 च्या अखेरीस अंबानी यांची संपत्ती सुमारे 61 अब्ज डॉलरवर पोचली आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीश निर्देशांकानुसार 2019 मध्ये अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांच्या संपत्तीत 11.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे. ऍमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 13.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यामुळे या दोघांपेक्षा मुकेश अंबानी यांची वर्षभरातील कामगिरी सरस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समभाग वधारल्याचा फायदा
चालू वर्षी रिलाइन्स इंडस्ट्रीज लि.चे समभाग 40 टक्‍क्‍यांची वधारल्यामुळे त्याचा फायदा अंबानी यांना झाला आहे. तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स या मूळ उद्योगांपेक्षा रिलायन्सने सध्या ग्राहक सेवा क्षेत्रांवर भर दिला आहे. गुंतवणूकदारांची रिलायन्सला मोठी पसंती आहे. त्यातही कंपनीच्या दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रातील रिलायन्सच्या कंपन्यांना सर्वाधिक मागणी आहे.

संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत रद्द 

ई-कॉमर्स क्षेत्रातील ऍमेझॉनसारख्या बलाढ्य कंपनीला भारतात आव्हान देण्याच्या उद्देशाने अंबानी यांनी दूरसंचार क्षेत्रात तब्बल 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, त्यातून जन्म घेतलेल्या रिलायन्स जिओने तीन वर्षांतच भारतातील सर्वांत मोठी मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी होण्याचा मान पटकावला आहे.

Video : अमृता फडणवीस-शिवसेना वाद पोहोचला टोकाला; ट्विटरवर वाक् युद्ध

चेहरामोहरा बदलला
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा चेहरामोहराच बदलून टाकला असून, कंपनीला तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रांतच नव्हे; तर दूरसंचार आणि रिटेलमध्येही आघाडीवर नेऊन ठेवले आहे. आता रिलायन्सची ई-कॉमर्स उद्योगात वेगाने वाटचाल सुरू आहे, अशी प्रतिक्रिया टीसीजी ऍसेट मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी चक्री लोकप्रिया यांनी व्यक्त केली. रिलायन्सला नवी दिशा देण्यासाठी मुकेश अंबानी यांनी नवे मार्ग शोधून, त्यात मोठी गुंतवणूक करत कंपनीला यश मिळवून दिले. पुढील चार वर्षांत कंपनीच्या समभागांच्या मूल्यात दुपटीने वाढू होण्याची शक्‍यता आहे, असेही लोकप्रिया यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flashback 2019 reliance anil ambani business growth in 2019