सोन्याची आयात निम्म्याने घटली

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

नवी दिल्ली : सोन्याच्या वाढत्या किंमतीचा परिणाम मागणीवर झाला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत आयातीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्या सोन्याची आयात निम्म्याने घटली आहे. 

वाणिज्य खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 2.7 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले. 

यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 51 टक्‍क्‍यांची घट झाली. 2015 मध्ये या दोन महिन्यात तब्बल 5.55 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते. सराफांकडून दागिन्यांसाठी सोन्याची आयात केली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मौल्यवान धातूच्या किमती वाढत आहेत. परिणामी विक्री घटली आहे. सलग चौथ्या महिन्यात सोने आयातीत घट नोंदवण्यात आली. यामुळे चालू खात्यातील तूट नियंत्रणात आली असून सरकारला दिलासा मिळाला आहे. 

Web Title: Gold imports declined by half

टॅग्स