नोटा बंद केल्याने महागाई कमी होईल: सुब्बाराव

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

सिंगापूर: पाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय गुंतवणूकीसाठी फायदेशीर असून त्यामुळे महागाईदेखील कमी होईल, असे मत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर मत व्यक्त करताना सुब्बाराव म्हणाले की, सध्याची परिस्थिती बघता मला असे वाटते की याचा परिणाम चांगलाच होईल. विशेषतः बॅंकांनी लोकांना रोख रकमेऐवजी इलेक्‍ट्रॉनिक व्यवहारांकडे वळण्याचे प्रोत्साहन देण्याची योग्य वेळ आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे रोख रकमेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. काल सिंगापूर येथे आयोजित मिंटएशियाच्या ग्लोबल बॅंकिंग कॉनक्‍लेव्ह 2016 मध्ये त्यांनी हे मत मांडले. इतर काही तज्ज्ञांनीदेखील या विषयावर आपली मते व्यक्त केली.

परंतु सरकारने आता चलन व्यवस्थापनासाठी कडक उपाययोजना करायची गरज असून पुन्हा काळा पैशाला वाव मिळणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Inflation will down : Subbarao