लवकरच येणार दहा रुपयांची नवी नोट

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

या नव्या नोटांसह सध्या चलनात असलेल्या जुन्या नोटाही चलनात कायम असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

मुबंई - सुरक्षेच्या नव्या वैशिष्ट्यांसह दहा रुपयांची नवी नोट लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंक ऑफ (आरबीआय) इंडियाने केली आहे.

ही नोट 2005 च्या महात्मा गांधी मालिकेतील असेल. त्यावर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. नोटेच्या एका बाजूला "द इअर ऑफ प्रिंटिंग, 2017' असा इंग्रजी अक्षरातील मजकूर असेल. सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटेप्रमाणे दहा रुपयांच्या नव्या नोटेवरील क्रमांकातील प्रत्येक आकड्याचा आकार वेगवेगळा (डावीकडून उजवीकडे वाढत जाणारा) असेल. मात्र, त्यातील पहिल्या तीन अक्षरांचा आकार सारखाच असेल.

या नव्या नोटांसह सध्या चलनात असलेल्या जुन्या नोटाही चलनात कायम असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Web Title: New Rs 10 notes with more security coming soon