योग्य मार्गाने खरेदी केलेल्या सोन्याची जप्ती नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या निवेदनानुसार, आता विवाहित महिलांना 50 तोळे, अविवाहित महिलांना 25 तोळे आणि पुरुषाला केवळ 10 तोळ्यांपर्यंत सोन्याचे दागिने बाळगता येणार आहे. गेल्या महिन्यात सरकारने वैयक्तिक सोने खरेदीवर बंधन घालण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले होते. 

नवी दिल्ली: सुधारित प्राप्तिकर कायद्यानुसार जाहीर उत्पन्न किंवा बचतीतून खरेदी करण्यात आलेले सोने जप्त करण्यात येणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, लोकांकडे असलेल्या वडीलोपार्जित दागिने आणि सोन्यावरदेखील हा कर आकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या निवेदनानुसार, आता विवाहित महिलांना 50 तोळे, अविवाहित महिलांना 25 तोळे आणि पुरुषाला केवळ 10 तोळ्यांपर्यंत सोन्याचे दागिने बाळगता येणार आहे. गेल्या महिन्यात सरकारने वैयक्तिक सोने खरेदीवर बंधन घालण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले होते. 

काळ्या पैशावर मात करण्यासाठी केंद्राने पाचशे व हजारांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेकांनी  सोन्यात हा पैसा गुंतवल्याच्या घटना घडल्याचे मानले जात होते. त्यामुळे वैयक्तिक सोने खरेदीवर बंधन येण्याची भीती व्यक्त केली जात होती. 

Web Title: No tax on gold purchased out of disclosed income