14 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा चालणार, टोलही माफ!

वृत्तसंस्था
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : देशातील नागरिकांसाठी दिलासा देत केंद्र सरकारने 14 नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे, बसस्थानक, वीजबिल, शासकीय कार्यालयांतील कर भरण्यासाठी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा वापर करता येणार असल्याचे जाहीर केले आहे.

देशातील राष्ट्रीय महामार्गावर आता 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्या पाठोपाठ महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील कोणत्याही टोलनाक्‍यावर 14 नोव्हेंबरपर्यंत वसुली होणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्याने बॅंकेत पैसे जमा करण्यासाठी तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठी दूरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र आजही (शनिवार) आढळून येत आहे. एटीएममध्ये घालण्यात आलेले पैसे काढण्यासाठी गर्दी होत असल्याचे काही तासांतच एटीएममधील पैसे संपत असल्याचेही चित्र आहे.

Web Title: Old notes valid upto 14 november