हिलरींना FBIचा दिलासा, बाजारात तेजी

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी 'एफबीआय'कडून दिलासा मिळाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 184 अंशांनी वाढून 27 हजार 458 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 63 अंशांनी वाढून 8 हजार 497 अंशांवर बंद झाला.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यावर खासगी ई-मेल सेवेचा वापर केल्याबद्दल गुन्हेगारी खटला दाखल होण्याची शक्‍यता होती. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. "फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (एफबीआय) या अमेरिकी तपास यंत्रणेने हिलरी यांना खटल्याला सामोरे जावे लागणार नाही, असे आज स्पष्ट केले. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण तयार झाले.

सेन्सेक्‍स आज सकाळी 27 हजार 591 अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. मात्र, नंतर सुरू झालेल्या नफेखोरीच्या वातावरणामुळे त्यात घसरण होण्यास सुरवात झाली. अखेर मागील सत्राच्या तुलनेत त्यात 184 अंशांची वाढ होऊन तो 27 हजार 458 अंशांवर बंद झाला. मागील पाच सत्रांत निर्देशांकात 667 अंशांची घसरण झाली होती. परकी भांडवलाचा बाहेर चाललेला ओघ याला कारणीभूत ठरला होता. कॅपिटल गुड्‌स वळगता सर्व क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज 1.94 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.

Web Title: world market surges after FBI relief to Hillary