रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पहिल्या तिमाहीतील कामगिरीमुळे 2 टक्के तेजीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई: शेअर बाजारात आज (सोमवार) रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आघाडीवर आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी रिलायन्सने पहिल्या आर्थिक वर्षातील तिमाही निकाल जाहीर केले आहेत. सरलेल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही नफ्यात 18.1 टक्के वाढ झाली असून, कंपनीचा एकूण नफा 7 हजार 113 कोटी रुपयांवर गेला आहे. परिणामी आज मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी वधारला आहे. शेअरने इंट्राडे व्यवहारात 1039 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

मागील आठ वर्षांत तेल शुद्धिकरणात सर्वाधिक फायदा कंपनीला झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 6 हजार 24 कोटी रुपये होता. कंपनीची उलाढाल मात्र, कमी झाली असून, कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेली घसरण कारणीभूत ठरली आहे. कंपनीची उलाढाल 76 हजार 615 कोटी रुपयांवरून 64 हजार 990 कोटी रुपयांवर आली आहे. कंपनीचा तेलशुद्धीकरण प्रकल्प जगातील मोठ्या प्रकल्पापैकी एक आहे. कंपनीला कच्च्या तेलाचा इंधनात रूपांतर करताना प्रतिबॅरल 11.5 डॉलर उत्पन्न मिळाले आहे. त्याआधीच्या तिमाहीत हे उत्पन्न प्रतिबॅरल 10.4 डॉलर होते.

सरलेल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 24.1 प्रतिशेअर झाले आहे. जे गेल्यावर्षी याच तिमाहीत 20.5 रुपये प्रतिशेअर होते. सध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्सचा शेअर 1029.50 रुपयांवर व्हवहार करत असून 16.95 रुपयांनी म्हणजेच 1.67 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: Reliance Industries shares rose 2 percent in the first quarter performance

टॅग्स