सावधान! OTP शिवाय खात्यातून काढले जातातय पैसे; तुम्ही अशी घ्या काळजी

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 22 September 2020

सध्या बॅंक फ्रॉडचं प्रमाण मोठं वाढलं आहे. फ्रॉड करणारी लोकं खोटा ओटीपी पाठवून लोकांना फसवत आहेत. एवढंच नाही तर पेटीएमचं केवायसी करायचं आहे म्हणून माहिती घेऊन ही लोकं नेहमी गंडा घालत असतात. 

नवी दिल्ली: सध्या बॅंक फ्रॉडचं प्रमाण मोठं वाढलं आहे. फ्रॉड करणारी लोकं खोटा ओटीपी पाठवून लोकांना फसवत आहेत. एवढंच नाही तर पेटीएमचं केवायसी करायचं आहे म्हणून माहिती घेऊन ही लोकं नेहमी गंडा घालत असतात. विशेष म्हणजे आपली फसवणूक झाल्याची तक्रार आपण बॅंकेत केली तर बॅंकही यावर हात वर करत आहे. आता अनलॉक 4 नंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता ग्राहकांनी कोणताही ओटीपी शेअर करताना काळजी घेतली पाहीजे.

उदाहरण घ्यायचं झालं तर, मुंबईतील एका व्यक्तीला बॅंकेतील व्यक्ती बोलत आहे असा कॉल काय येतो आणि पुढील व्यक्ती पेटीएमवरून पैसे कसे ट्रांसफर करण्याची माहिती देऊ लागते काय. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला फोन आलेला असतो त्याचं ना पेटीएमचं अकाउंट होतं ना इंटरनेट बॅंकीगचा तो उपयोग करत होता. असे अनेक अनुभव बऱ्याच लोकांना येत असतात. यात काही जण त्यांची माहिती देऊन मोठी चूक करतात. 

महिलांनो तुमच्यासाठी PNB ची खास स्कीम, टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी आता जबरदस्त...

नंतर त्या व्यक्तीने स्वतःचा फोन चेक केला तर तिथं ओटीपी किंवा बॅंक बॅंलंसबद्दलचा कोणताच संदेश आला नव्हता. पण याकाळात त्या व्यक्तीच्या अकाउंटवरून अनेक जणांच्या पेटीएम अकाउंटवर पैसे गेल्याचे आढळले. या फसवणूकीत त्या व्यक्तीच्या बॅंक अकाउंटवरून तब्बल 42 हजार 368 रुपये कमी झाले होते. ही सर्व माहिती त्या व्यक्तीने त्याचं बॅंक पासबुक अपडेट केल्यावर समजलं.

हे सगळं प्रकरण पोलिसांकडे गेल्याने पोलिसांनी या फ्रॉडची बॅंकेकडून माहिती मागविली आहे. नेमकी बॅंक डीटेल्स लिक कसे झाले याची चौकशी पोलिस करत आहेत. आजकाल बॅंक फ्रॉडचं प्रमाण वाढलं असताना यात नवनवीन पध्दतीने लोकांची फसवणूक केली जात आहे. बॅंक फ्रॉडपासून कसं वाचायचं याची माहिती रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी ग्राहकांना देत असते. रिझर्व्ह बॅंकेच्या कॅंपेनमध्ये फ्रॉड टाळण्यासाठी काय-काय केलं पाहिजे याची माहिती दिली जाते. 

भांडवल उभा करायचे आहे तर या चार गोष्टी लक्षात ठेवा...

जर ग्राहक इंटरनेट बॅंकीग अथवा मोबाईल बॅंकीगचा उपयोग करत असेल तर त्यांनी व्यवहार करताना मोठी काळजी घेतली पाहिजे, असं RBI आणि बॅंकीग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं आहे. पुढे दिलेल्या काही तज्ज्ञांनी सुचनांचं पालन केलं तर बॅंक फ्रॉडपासून आपण वाचू शकतो.

1. कसल्याही स्थितीत कुणालाही तुमच्या क्रेडीट अथवा डेबिट कार्डची माहिती देणं टाळलं पाहिजे. 
2. कोणत्याही सार्वजनिक वाय-फायवर तुमचे बॅंक ट्राझॅक्शन करु नये. 
3. बॅंक खात्याला नेहमी मोबाईल नंबरसह अपडेट करत रहा.
4. बॅंकींग डिटेल्स जसे की, सीवीवी कोड, पिन नंबर मोबाईलमध्ये सेव करत जाऊ नका.
5. तसेच तुमच्या मोबाईलमधील कोणत्याही पेमेंट एपला जास्तीच्या परमिशन देणं टाळा.
6. शक्य असल्यास इंटरनेट बॅंकींगसाठी एखादं दुसरं अकाउंट वापरा ज्यात कमी पैशे असतील.
7. तुमचं मुख्य बॅंक अकाउंट कुठेही लिंक करणे टाळा.
 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Bank account will be cleared without OTP to avoid this follow