esakal | बजेटआधीच खुशखबर; जानेवारी महिन्यात GST चे रेकॉर्डतोड संकलन
sakal

बोलून बातमी शोधा

GST.

बजेटच्या आधीच अप्रत्यक्ष करांच्या वसूलीमध्ये झालेली ही वाढ सरकारसाठी अत्यंत उत्साहवर्धक बातमी आहे

बजेटआधीच खुशखबर; जानेवारी महिन्यात GST चे रेकॉर्डतोड संकलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात GST च्या संकलनाने (GST Collections) जानेवारी 2021 मध्ये रेकॉर्ड केला आहे. जानेवारी महिन्यातच GST 1.19 लाख कोटी रुपये जमा झाला आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी याबाबतची माहिती दिली. बजेटच्या आधीच अप्रत्यक्ष करांच्या वसूलीमध्ये झालेली ही वाढ सरकारसाठी अत्यंत उत्साहवर्धक बातमी आहे. कोरोना महासंकटानंतर अर्थव्यवस्थेचं कंबरडं अधिकच मोडलं होतं. अशा पार्श्वभूमीवर सरकारी तिजोरीत झालेली ही रेकॉर्डतोड वसूली आशादायक मानली जात आहे. 

हेही वाचा - Budget 2021 Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण-राज्यमंत्री अनुराग ठाकूर मंत्रालयात दाखल
GST महसूल गेल्या चार महिन्यांमध्ये एक लाख कोटींच्या आसपास राहिला आहे. अर्थमंत्रालयाने म्हटलंय की, GST मधील वाढ या गोष्टीचे संकेत देतो की कोविड-19 महासंकटानंतर अर्थव्यवस्थेला उभारी मिळत आहे. जानेवारी 2021 मधील GST संकलन 2017 मध्ये GST ची नवी व्यवस्था लागू झाल्यानंतरची सर्वांत मोठी वसूली आहे. जवळपास 1.2 लाख कोटी रुपयांचा टप्पा या संकलनाने गाठला आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटलं की, डिसेंबर 2020 मध्ये GST संकलन 1.15 कोटी रुपये राहिले होते.
मंत्रालयाने आपल्या एका वक्तव्यात म्हटलं की, गेल्या चार महिन्यांच्या दरम्यान सातत्याने GST चे संकलन एक लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले आहे. कोरोनामुळे लागलेल्या झटक्यांनंतर अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याचंच हे लक्षण असल्याचं मंत्रालयाने म्हटलंय. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 31 जानेवारी 2021 राजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत या महिन्याचे GST संकलन 1 लाख 19 हजार 847 कोटी रुपये राहिले आहे. यामध्ये CGST 21 हजार 923 कोटी, SGST 29 हजार 104 कोटी आणि IGST 60 हजार 288 कोटी रुपये राहिले आहे. वस्तुंच्या आयातीवर 27424 कोटी आणि सेसमधून 8622 कोटी रुपये मिळाले आहेत. एकूण दाखल GSTR-3B रिटर्नची संख्या डिसेंबर 31 जानेवारीपर्यंत 90 लाखपर्यंत पोहोचली आहे. 

loading image
go to top