Share: एका वर्षात 1 लाखाचे 9 लाख, एक्सपर्टचा आवडता 'हा' शेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share: एका वर्षात 1 लाखाचे 9 लाख, एक्सपर्टचा आवडता 'हा' शेअर

नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सचे (KMEW) शेअर्स बुधवारी इंट्राडेमध्ये 5 टक्क्यांनी वाढून 918 रुपयांवर पोहोचले. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर जवळपास 16 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या बोर्डाने दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया आणि इतरांना प्रिफरेंशियल इश्यू जारी करण्यास मान्यता दिली आहे.

गेल्या पाच महिन्यांत नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सचे (KMEW) शेअर्स 263 रुपयांच्या पातळीवरून जवळपास 250 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 740 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीच्या बोर्डाने प्रत्येकी 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असणारे 5,65,000 इक्विटी शेअर्स, 700 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या दराने प्रिफरेंशियल बेसिसवर वाटप करण्यास मान्यता दिली आहे. या शेअर्सची किंमत 39.55 कोटी रुपये असेल.

हेही वाचा: Chemical Stock: या केमिकल कंपनीचा 4000% पेक्षा जास्त परतावा, आता स्टॉक स्प्लिटचा निर्णय...

कंपनीच्या बोर्डाने या शेअर्सपैकी आशिष कचोलियांना 2,00,000 शेअर्स आणि वैभव कचोलियांना 30,000 शेअर्स वाटप करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय वनजा सुंदर अय्यर यांना 2,52,000 शेअर्स आणि शिव सहगल यांना 35,000 शेअर्स वाटप करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Share Market: आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स सध्या बीएसई एसएमई प्लॅटफॉर्म अंतर्गत एम ग्रुपवर ट्रेड करते. एक्सचेंजचे एसएमई प्लॅटफॉर्म लहान आणि मध्यम कंपन्यांसाठी आहे ज्यांच्यात वाढीची मोठी क्षमता आहे.ही कंपनी 22 मार्च 2021 रोजी बाजारात लिस्ट झाली होती, त्यावेळी आयपीओमधून 37 रुपये प्रति शेअर दराने शेअर्स ऍलॉट केले होते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.