सोने खरेदीत दशकातील सर्वात महागडा दसरा; असे होते मागील दहा वर्षातील भाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी होते. त्यामुळे त्या वर्षातला दसऱ्याच्या दिवशीचा सोन्याचा दर महत्त्वाचा असतो. 2010 साली दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर होता 19हजार 820 आणि आजचा दर आहे 39 हजार 300 आहे.

पुणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी होते. त्यामुळे त्या वर्षातला दसऱ्याच्या दिवशीचा सोन्याचा दर महत्त्वाचा असतो. 2010 साली दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर होता 19हजार 820 आणि आजचा दर आहे 39 हजार 300 आहे. 2015 नंतर सोन्याचा दर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या वर्षीच्या दसऱ्याला सोन्याचा दर 31 हजार 912 होता. तो आता 39 हजार 300 झाला आहे. सोन्याच्या वाढत्या भावामुळे सोने खरेदीवर मात्र परिणाम होत आहे.

असे आहेत सोन्याचे मागील दहा वर्षातील दर
2010 - 19820
2011 - 26510
2012 - 30854
2013 - 28350
2014 - 26559
2015 - 26862
2016 - 29678
2017 - 29557
2018 - 31912
2019 - 39300


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 Year Gold Price History on Dussehra festival

टॅग्स