
ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याने फूड डिलिव्हरी कंपनी ‘स्विगी’कडून पुढील महिन्यात सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे. स्विगीची उपकंपनी आणि खासगी किचन ब्रॅंड म्हणून कार्यरत असलेल्या ‘बाऊल कंपनी’ आणि ‘होमली’ या कंपनीतील कर्मचाऱ्यांचाही यात समावेश असणार आहे.
नवी दिल्ली - ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याने फूड डिलिव्हरी कंपनी ‘स्विगी’कडून पुढील महिन्यात सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे. स्विगीची उपकंपनी आणि खासगी किचन ब्रॅंड म्हणून कार्यरत असलेल्या ‘बाऊल कंपनी’ आणि ‘होमली’ या कंपनीतील कर्मचाऱ्यांचाही यात समावेश असणार आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरु असल्याने इतर अनेक ऑनलाइन डिलिव्हरी देणारे व्यवसाय ठप्प झाले आहेत. परंतु ‘फूड डिलिव्हरी’ सेवेला सरकारने अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट केल्याने स्विगी आणि प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोचा व्यवसाय सुरू आहे. मात्र, डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ग्राहकांनी हॉटेलमधून मागविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांकडे पाठ फिरवली आहे.
ग्राहक आणि कर्मचारी नसल्याने अनेक हॉटेल बंद पडली आहेत. त्यामुळे विविध भागातून येणाऱ्या ऑर्डरची पूर्तता करणे शक्य होत नसल्याने ‘स्विगी’च्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. व्यवसाय होत नसताना कंपनीवर येणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या लॉकडाउन काळात कंपनी खंबीरपणे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, मे महिन्यात कर्मचारी कपातीची वेळ येऊ शकते.