नोटाबंदीनंतर 1100 छापे; आढळली 5400 कोटींची अघोषित संपत्ती

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर 9 नोव्हेंबरपासून 10 जानेवारीदरम्यानच्या कालावधीत प्राप्तिकर विभागाने 1100 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकून 610 कोटी रुपये जप्त केले असून 5400 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळली असून या तपास करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत दिली आहे.

शिमला येथील खासदार विरेंद्र काश्‍यम आणि इतर 10 खासदारांना गंगवार यांनी लोकसभेत लेखी माहिती दिली. प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईत 513 कोटी रुपयांच्या रोख रकमेसह सोने, दागिने आणि चांदीचा समावेश असलेली एकूण 610 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 110 कोटी रुपये किंमतीच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 5100 जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे 10 डिसेंबरपर्यंत 12.44 लाख रुपये किंमतीच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याचेही गंगवार यांनी सांगितले.

Web Title: 1100 searches conducted, Rs. 5400 crore undisclosed income detected by it dept