देशातील 123 कोटी नागरिक झाले आधार कार्डधारक

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

नवी दिल्ली: देशातील 123 कोटी नागरिकांपर्यत आधार कार्ड पोचवण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. जवळपास 123 कोटी नागरिक आधार कार्डधारक झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी राज्यसभेत दिली आहे. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना हंसराज अहीर यांनी सांगितले की 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी 8 लाख 54 हजार 977 इतकी आहे. 

युआयडीएआयने 30 नोव्हेंबर 2018 पर्यत आतापर्यत एकूण 122 कोटी 90 लाख आधार कार्डची नोंदणी केली आहे. यातील 6 कोटी 71 लाख इतक्या पाच वर्षांखालील लहान मूलांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे. तर 5 ते 18 वयोगटातील 29 कोटी 2 हजार आधार कार्डची नोंदणी झाली आहे. देशातील सध्याचा जन्मदर 20.4 असून मृत्यूदर 6.4 इतका आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 123 crore Aadhaar cards issued to people