
13 वर्षाचा गणेश कोट्यावधी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीचा मॅनेजर
पणजी: कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून शिक्षणव्यवस्था ऑनलाईन झाली आहे. यामध्ये घरी बसूनच मोबाईल किंवा टॅबद्वारे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या वाढत्या ऑनलाईन शिक्षणाचे प्रमाण पाहता गोव्यातील (Goa News) गणेश नाईक (Ganesh Naik) या विद्यार्थ्याने एक शक्कल लढवली. इतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात फायदा व्हावा यासाठी त्याने ऑनलाईन अभ्यासाचे साहित्य तयार केले होते. याचा फायदा प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला. एवढ्यावरच न थांबता गणेश तंत्रज्ञानाचा उपयोग करत कोट्यावधी गुंतवणूक झालेल्या कंपनीचा मॅनेजरही (Cryptocurrency Manager) झाला आहे. विशेष म्हणजे गणेश हा अवघ्या तेरा वर्षांचा आहे. (Finance News In Marathi)
गणेश हा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी असून तो सध्या पणजीतील पिपल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. हा विद्यार्थी आता PolyGaj या आभासी चलनाचे व्यवहार करणाऱ्या कंपनीचा निर्माता ठरला आहे. गणेशने दोन डॅपची (decentralised application) निर्मिती पॉलिगॉन नेटवर्कवर केली आहे, ज्याद्वारे क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करता येते.
हेही वाचा: IPO Update: 4 ऑगस्टला होणार Windlas Biotech चा आयपीओ लॉंच
PolyGaj हे वन स्टॉप DeFi (decentralized finance) आणि NFT प्लॅटफॉर्म आहे. तर StableGaj द्वारेही पॉलिगॉन नेटवर्कवर व्यवहार करता येतो. गणेशच्या वयाची मुले सध्या ऑनलाईन शिक्षणात व्यस्त आहेत तर इकडे त्याने स्वतः एक मोठा व्यवसाय सुरू केला आहे. PolyGaj द्वारे गणेशने आतापर्यंत 70 दशलक्ष क्रिप्टोकरंसीकडे वळवले आहेत. काही दिवसांपुर्वीच अमेरिकन उद्योगपती मार्क कुबेन यांनीही यात पैसे गुंतवले आहेत. DeFi यंत्रणा ही बँकेसारखी काम करते.
'मागील वर्षी सगळे क्लास ऑनलाईन सुरू झाल्याने मी ऑनलाईन दुसरे कोर्सेसही करण्याचे ठरवले. त्यामध्ये मी बफॅलो विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्सही केला. तसेच न्यूयॉर्क विद्यापीठाचेही काही कोर्स केले होते', अशी माहिती गणेशने दिली. गणेशचे वडील गोव्यात प्राशासनिक अधिकारी आहेत.
हेही वाचा: शेअर बाजारातील IPO म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर
गणेशने वयाच्या आठव्या वर्षापासून बूटकॅम्पमधील कोडींग शिकला होता. तसेच त्याला C, C++, Java, JavaScript चेही ज्ञान आहे. गणेशने सांगितले की, त्याला ब्लॉकचेनचे आकर्षण त्याने जेंव्हा 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय ब्लॉकचेन काँग्रेसचे लेक्चर पाहिल्यानंतर वाढले जे गोवा सरकारच्या साहायाने भरले होते.
Web Title: 13 Year Old Ganesh Naik Manager Of Millions Dollars Crypto Currency
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..