
मुंबई: देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या अॅक्सिस बॅंकेत मागील काही महिन्यात 15,000 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मध्यम पातळीवरील आणि शाखा पातळीवरील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राजीनामा दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बॅंकेत संस्थात्मक पुनर्रचना करण्याच्या नव्या मॅनेजमेंटच्या धोरणाशी जुळवत न घेता आल्यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बॅंकेतून बाहेर पडताना दिसत आहेत. बॅंकेने कर्मचाऱ्यांना दिलेले कामाचे नवे मोठे उद्दिष्ट गाठणे कर्मचाऱ्यांच्या आवाकाबाहेर जात आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील बॅंकेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्वांचा परिणाम अॅक्सिस बॅंकेच्या अनेक शाखांवर होणार आहे. त्यामुळे बॅंकेच्या दैनंदिन कामकाजालाही फटका बसणार आहे.
आणखी वाचा : कामगार कष्टकऱ्यांशी पंगा घ्याल तर महागात पडेल
बॅंक ज्या पद्धतीने काम करते आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये त्यांची बॅंकेतील भूमिका आणि कामाचे स्वरुप याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. बॅंकेच्या कार्यसंस्कुतीत झालेला बदल स्वीकारणे अनेक जुन्या कर्मचाऱ्यांना जड जाते आहे, अशी माहिती एका इंग्रजी संकेतस्थळावर आली आहे.
आणखी बातम्या वाचा : संपातही सुसाट धावली एसटी
सध्या बॅंकेत होत असलेल्या संस्थात्मक पुनर्रचनमुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे स्वरुप आणि बॅंकेतील त्यांचे नेमके स्थान याविषयीच पुरेशी स्पष्टता नाही. अॅक्सिस बॅंकेने व्यवसायातील वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर भर दिला आहे. यामुळे अनेक जुन्या आणि अनुभवी कर्मचाऱ्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. नव्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आणखी वेगवान केल्याची माहिती बॅंकेने दिली आहे.
आणखी वाचा : पत्नीला म्हणाला, बाहेर चाललोय अन् गेला लॉजवर
पुढील दोन वर्षात 30,000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली आहे. सध्या अॅक्सिस बॅंकेत एकूण 72,000 कर्मचारी आहेत. जानेवारी 2019 मध्ये बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमिताभ चौधरी यांनी बॅंकेच्या व्यवस्थापनात अनेक बदल केले आहेत.