पत्नीला म्हणाला, बाहेर चाललोय अन् गेला लॉजवर

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

पत्नीला एसएसएस करून बाहेर गावी जात असल्याचे सांगितले. पण, प्रेयसीला घेऊन लॉजवर गेल्यानंतर रात्र घालवली आणि सकाळी दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इंदूर (मध्य प्रदेश): पत्नीला एसएसएस करून बाहेर गावी जात असल्याचे सांगितले. पण, प्रेयसीला घेऊन लॉजवर गेल्यानंतर रात्र घालवली आणि सकाळी दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाशंकर विश्वकर्मा (वय 26) याने पत्नीला एसएसएस करून भोपाळला जात असल्याचे सांगितले. परंतु, उमाशंकर हा प्रेयसी मनीषा (वय 19) सोबत एका लॉजवर गेला. दोघांनी रात्र सोबत घालवली. दुसऱया दिवशी लॉजचा कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी मनीषा गॅलरीमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. कर्मचाऱयाने तत्काळ व्यवस्थापकाला माहिती दिली. उमाशंकरही बेशुद्धावस्थेत होता. दोघांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मनीषाचा मृत्यू झाला तर तीन तासानंतर उमाशंकरचा मृत्यू झाला. याबाबातचा पुढील तपास सुरू आहे.

प्रियकर-प्रेयसीने सोडला सासूच्या अंगावर नाग अन्...

उमाशंकर हा देवास येथील एका कंपनीमध्ये काम करत होता. त्याच्या पाठीमागे पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे. उमाशंकरची कंपनीमध्येच मनीषा सोबत ओळख झाली होती. दोघांच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी आढळून आलेली नाही. यामुळे दोघांनी विष पिवून कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे तपासादरम्यान समजेल, असेही पोलिसांनी सांगितले.

विमानतळावर महिलेसमोरच सुटला 'कंट्रोल' पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover suicide in lodge at indore city in madhya pradesh