'या' केमिकल स्टॉकचा 195% परतावा, डिव्हिडेंडची घोषणा...

जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारखेच्या आधी विकले असतील किंवा नंतर विकत घेतले असतील तर त्यांना डिव्हिडेंड मिळणार नाही.
dividend
dividendgoogle

केमिकल सेक्टरमधील कंपनी यशो इंडस्ट्रीजने (Yasho Industries) त्यांच्या भागधारकांना आर्थिक वर्ष 2022 साठी प्रति शेअर 0.50 रुपये लाभांश अर्थात डिव्हिडेंड जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची 30 एप्रिल 2022 रोजी बैठक झाली, ज्यामध्ये भागधारकांना 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवरील प्रत्येक शेअरवर 5 टक्के (0.50) लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली होती असे कंपनीने 20 जूनला स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत सांगितले.

मंगळवार, 12 जुलै 2022 रोजी होणार्‍या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) डिव्हिडेंड देण्याच्या निर्णयाला कंपनीची मंजुरी मिळणार असल्याचे समजत आहे.

कंपनीने डिव्हिडेंड भरण्यासाठी 5 जुलै 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच 5 जुलै 2022 रोजी शेअर बाजारातील व्यवहार बंद होताना, कंपनीच्या भागधारकांना डिव्हिडेंड मिळेल. जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारखेच्या आधी विकले असतील किंवा नंतर विकत घेतले असतील तर त्यांना डिव्हिडेंड मिळणार नाही.

यशो इंडस्ट्रीजच्या शेअर्सने एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना दुप्पट म्हणजेच मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यशो इंडस्ट्रीजचे शेअर्स सोमवारी एनएसईवर 1.27% वाढून 1,299.40 रुपयांवर बंद झाले.

एक वर्षापूर्वी, 21 जून 2021 रोजी, यशो इंडस्ट्रीजचे शेअर्स एनएसईवर 440.80 रुपयांवर होते. म्हणजेच, गेल्या एका वर्षात यशो इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 194.78% परतावा दिला आहे आणि त्यांच्या शेअर्सची किंमत 440.80 रुपयांवरून 1,299.40 रुपयांपर्यंत वाढली आहे.

गेल्या 6 महिन्यांत यशो इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत सुमारे 19 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे, गेल्या 5 वर्षांचा विचार केला तर यशो इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 1,190 टक्के इतका मोठा परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com