मोदी 2.0: जीएसटी कौन्सिलची पहिली बैठक 21 जूनला

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील जीएसटी कौन्सिलची पहिली बैठक 21 जूनला होणार आहे. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन अनेक प्रस्तावांवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याआधी ही बैठक 20 जूनला होणार होती. जीएसटी कौन्सिलची ही 35वी बैठक असणार आहे.

 अनेक मुद्द्यांवर नव्या अर्थमंत्री काय धोरण स्वीकारतात याकडे देशाचे लक्ष आहे. इलेक्ट्रीक वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणणे, करचोरीला प्रतिबंध घालण्यासाठी नवे मार्ग, नॅशनल अॅंटी प्रोफिटिअरिंग ऑथोरिटी (एनएए) ला नोव्हेंबर 2020 पर्यत मुदतवाढ देणे, इलेक्ट्रॉनिक इन्व्हॉईस प्रणाली, राज्यांच्या महसूलाची स्थिती, नवी प्राप्तिकर कर भरणा प्रणाली यासारख्या असंख्य मुद्द्यांवर या बैठकीत निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे. याशिवाय एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोलवरील कर यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल हे दारूप्रमाणे पिण्यासाठी वापरले जात नसून त्याचा उद्योगांमध्ये कच्चा माल किंवा मालावरील प्रक्रियेसाठी वापर केला जातो. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1st GST Council Meet under Modi 2.0