'एचएसबीसी'कडून 200 जणांना "ले ऑफ' !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

हॉंगकॉंग अँड शांघाय बॅंकिंग कॉर्पोरेशन (एचएसबीसी) या ब्रिटिश बॅंकेने पुणे आणि हैदराबादमधील 200 कर्मचाऱ्यांना "ले ऑफ' दिला असून, हे सर्व कर्मचारी बॅक ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. एचएसबीसी जागतिक पातळीवर आपल्या कामकाजाची पुनर्रचना करते आहे, त्याचा फटका भारतातील कर्मचाऱ्यांनाही बसला आहे.

नवी दिल्ली - हॉंगकॉंग अँड शांघाय बॅंकिंग कॉर्पोरेशन (एचएसबीसी) या ब्रिटिश बॅंकेने पुणे आणि हैदराबादमधील 200 कर्मचाऱ्यांना "ले ऑफ' दिला असून, हे सर्व कर्मचारी बॅक ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. एचएसबीसी जागतिक पातळीवर आपल्या कामकाजाची पुनर्रचना करते आहे, त्याचा फटका भारतातील कर्मचाऱ्यांनाही बसला आहे.

एचएसबीसीचे जगभरात तब्बल 2 लाख 38 हजार कर्मचारी आहेत. त्यातील काही हजार कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यावर "ले ऑफ'चे संकट घोंगावते आहे. ले ऑफ दिलेल्यांमध्ये मुख्यत: मधल्या फळीतील व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून, बॅंकेच्या बॅक ऑफिसमध्ये 15,000 कर्मचारी कार्यरत आहेत.

ग्राहक आणि गुंतवणूकदारांना अधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी, एचएसबीसी आपल्या मनुष्यबळाची पुनर्बांधणी करते आहे, असे बॅंकेकडून सांगण्यात आले. ले ऑफमागे विविध कारणे असून, त्यात वेगवेगळे प्रकल्प, वैयक्तिक कामगिरी यासारख्या बाबींचा समावेश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे वारे घोंगावत असताना हा निर्णय समोर आला आहे.

ले ऑफ म्हणजे...?
ठरावीक दिवस किंवा कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येते. नंतर गरजेनुरूप त्यांना पुन्हा कार्यान्वित केले जाते, याला "ले ऑफ' असे म्हणतात. खर्चातील कपात करण्यासाठी बॅंका किंवा कंपन्या हा मार्ग अवलंबत असतात. मात्र, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यावर असुरक्षिततेची टांगती तलवार राहते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 People Lay Off by HSBC