मल्ल्यांकडील कर्जवसुलीचा निर्णय राखून ठेवला

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

बंगळूर : उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडील सुमारे नऊ हजार कोटींच्या कर्जवसुलीसंदर्भात बॅंकांनी केलेल्या याचिकेवर कर्जवसुली लवादाने निर्णय राखून ठेवला
आहे.

विजय मल्ल्यांच्या किंगफिशरला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह 17 बॅंकांनी कर्ज दिले आहे. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज यामुळे कर्जाची थकबाकी नऊ हजार कोटींपर्यंत वाढली आहे.

दरम्यान, बॅंकांसह जवळपास 30 इतर तक्रारदारांनीही कर्जवसुली लवादाकडे धाव घेतली होती. बॅंकांनी 2013 मध्ये लवादाकडे मल्ल्या आणि किंगफिशर समूहाची मालमत्ता विक्री करून कर्ज वसुली करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

मल्ल्यांविरोधात कर्जवसुलीच्या तक्रारी कोणत्याही निर्णयाविना निकालात काढण्यात आल्या आहेत. मल्ल्या आणि त्यांच्या कंपनी विरोधातील बॅंकांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवण्यात आला असून तो कधी जाहीर करणार, याबाबत प्राधिकरणाने स्पष्टीकरण दिलेले नाही.