‘अरबिंदो फार्मा’ला रु.578 कोटींचा नफा; शेअरमध्ये घसरण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनी अरबिंदो फार्माला डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 578.59 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 6.29 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. याआधीच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला 544.31 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या निकालांच्या शेअरवर मात्र नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

यादरम्यान, कंपनीच्या एकुण विक्रीचे प्रमाण 3,442.18 कोटी रुपयांवरुन 3,844.47 कोटी रुपयांवर पोचले आहे.

मुंबई शेअर बाजारात आज(शुक्रवार) कंपनीचा शेअर 710 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 681 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 710 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 35 मिनिटे) कंपनीचा शेअर 684.45 रुपयांवर व्यवहार करत असून 3.11 टक्क्यांनी घसरला आहे.