esakal | झोमॅटोच्या आयपीओला 38 पट जास्त मागणी; मात्र कर्मचाऱ्यांची कमी मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Zomato IPO

झोमॅटोच्या आयपीओला 38 पट जास्त मागणी; मात्र कर्मचाऱ्यांचा 'इंट्रेस' कमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : झोमॅटोच्या (Zomato) प्राथमिक भागविक्रीसाठी (IPO) गुंतवणुकदारांनी (investors) 38 पट जास्त मागणी नोंदवली आहे. इतर सर्व गटात हा आयपीओ (IPO) तुफान ओव्हरसबस्क्राईब झाला असला तरी गमतीचा भाग म्हणजे झोमेटॉच्या (Zomato) कर्मचाऱ्यांनी यात फारशी उत्सुक्तता दाखवली नाही. (38 times higher demand Zomato IPO But low demand staff)

कर्मचाऱ्यांसाठी 65 लाख समभाग राखीव ठेवले असताना त्यांनी फक्त 40 लाख 50 हजार 345 समभागांसाठीच मागणी केली आहे. आज या आयपीओसाठी अर्ज करण्याची मुदत संपल्यावर 71 कोटी 92 लाख विक्रीयोग्य समभागांसाठी एकूण दोन हजार 751 कोटी मागण्या (38.25 पट) नोंदविण्यात आल्या.

हेही वाचा: सेन्सेक्स शुक्रवारीही 53 हजारांवर; निर्देशांकांत अल्प घसरण

सामान्य गुंतवणुकदारांनी 7.45 पट मागणी नोंदवली, या गटासाठी 12 कोटी 95 लाख समभाग राखीव असताना 96.49 कोटी मागण्या आल्या. संस्थात्मक गुंतवणुकदारांच्या गटात सर्वात जास्त म्हणजे 51.79 पट मागण्या आल्या. त्यांच्यासाठी 38.88 कोटी समभाग राखीव असताना दोन हजार 13 कोटी समभागांसाठी मागण्या आल्या. तर बड्या गुंतवणुकदारांनीही 32.96 पट मागणी नोंदविली. त्या गटात 19.43 कोटी समभाग राखीव असताना 640 कोटी समभागांच्या मागण्या आल्या. ही माहिती मुंबई शेअर बाजाराच्या वेबसाईटवर नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा: पुढील शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा

loading image