esakal | सेन्सेक्स शुक्रवारीही 53 हजारांवर; निर्देशांकांत अल्प घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

सेन्सेक्स शुक्रवारीही 53 हजारांवर; निर्देशांकांत अल्प घसरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : कोणत्याही ठोस संकेतांअभावी आज भारतीय शेअर (Indian Share Market) निर्देशांकांमध्ये अल्प घसरण झाली. सेन्सेक्स (Sensex) 18 अंश व निफ्टी (Nifty) एक अंशापेक्षाही कमी घसरला असला तरी सेन्सेक्स आज 53 हजारांवर टिकून राहण्यात यशस्वी ठरला. (Sensex friday 53 Thousands index fell slightly)

आज सेन्सेक्स (Sensex) 53,140 अंशांवर तर निफ्टी (Nifty) 15,923 अंशांवर स्थिरावला. आजही निफ्टी 16 हजारांना स्पर्श करू शकला नाही. यापूर्वी सेन्सेक्स सात जुलै रोजी 53 हजारांच्यावर बंद झाला होता, मात्र तो दुसऱ्या दिवशी 53 हजारांखाली घसरला होता. त्यानंतर तो केव्हाही 53 हजारांवर बंद झाला नव्हता, मात्र काल सेन्सेक्स 53 हजारांवर बंद झाल्यावर पुन्हा आज तो 53 हजारांवर टिकून राहिला, त्यामुळे गुंतवणुकदारांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा: शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आज सेन्सेक्समधील एचसीएल टेक तीन टक्के घसरला, तर इन्फोसिस ( बंद भाव 1,555 रु. ), आयसीआयसीआय व इंडसइंड बँक एक टक्का घसरले. स्टेट बँक, टीसीएस, मारुती, महिंद्र आणि महिंद्र, एचडीएफसी या समभागांचे दरही घसरले. तर भारती एअरटेल 15 रुपयांनी वाढून 541 रुपयांवर स्थिरावला. टाटा स्टील (1,278 रु.), रिलायन्स (2,111), आयटीसी (207), सनफार्मा, लार्सन टुब्रो, डॉ. रेड्डी यांचे दरही वाढले.

हेही वाचा: 'भेकड आणि संघ विचारसरणीच्या लोकांनी काँग्रेसपासून लांब रहावं'

आजचे सोन्याचांदीचे दर

  • सोने - 48,350 रु.

  • चांदी - 69,700 रु.

loading image