निम्मे टीव्ही चीनमधून आयात

TV
TV

नवी दिल्ली - देशात मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) ७ हजार २२४ कोटी रुपयांचे दूरचित्रवाणी (टीव्ही) संच आयात करण्यात आले. यातील अर्ध्याहून अधिक टीव्ही संच चीनमधील आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत दिली.

मागील आर्थिक वर्षात टीव्ही संचांची आयात वाढली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात (२०१७-१८) ही आयात ४ हजार ९६२ कोटी रुपये होती. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘देशात टीव्ही संचांचे उत्पादन व्हावे यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. यात कमी शुल्क आकारणी करण्यासोबत एलसीडी, एलईडी आणि प्लाझ्मा पॅनेलच्या आयातीवरील शुल्कात सवलत देण्यात आली आहे. यामुळे देशातील एकूण टीव्ही संचांपैकी ८० टक्के गरज देशातच पूर्ण होत आहे.’’  

‘मागील आर्थिक वर्षात टीव्ही संचांची आयात ७ हजार २२४ कोटी रुपये आहे. यातील ७ हजार ११ कोटींची आयात चीन, व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग आणि तैवान या पाच देशांतून झालेली आहे. व्हिएतनाममधून शुल्कमुक्त आयात वाढल्याने ‘इंडिया सेल्युलर अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशन’ने जानेवारीमध्ये आयात तीन महिने थांबविण्याची शिफारस केली होती. भारताचा ‘असियान’ देशांशी मुक्त व्यापार करार आहे. यामुळे या देशांना शुल्कात सवलत दिली जाते. यामध्ये व्हिएतनाम आणि मलेशिया यांचा समावेश आहे,’’ असे प्रसाद यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com