सात भारतीयांच्या संपत्तीत गेल्या सहा महिन्यांत कमालीची वाढ!

सात भारतीयांच्या संपत्तीत गेल्या सहा महिन्यांत कमालीची वाढ!

मुंबई: देशातील 7 श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत गेल्या सहा महिन्यात चांगलीच भर पडली आहे. त्यातही 5 श्रीमंत अब्जाधीशांच्या संपत्तीत 15 अब्ज डॉलरची (1 लाख कोटी रुपये) भर पडली आहे. या सात श्रीमंत व्यक्तींनी एकूण 1 लाख 40 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. शेअर बाजारात मागील सहा महिन्यात वाढलेल्या संपत्तीच्या एक पंचमांश इतकी ही रक्कम आहे. लक्ष्मी मित्तल यांचा अपवाद वगळता पाच श्रीमंत अब्जाधीशांनी प्रत्येकी किमान 12,000 कोटी रुपयांची भर त्यांच्या संपत्तीत घातली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7.41 अब्ज डॉलरची भर पडली आहे. 28 जून 2019 अखेर त्यांची संपत्ती 51.7 अब्ज डॉलरवर पोचली आहे. मागील सहा महिन्यात त्यांच्या संपत्तीत 50,000 कोटी रुपयांची वाढ होऊन ते जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहे.

या यादीत दुसरा क्रमांक विप्रोचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यासाठी ख्याती असलेले अझिम प्रेमजी यांचा लागतो. प्रेमजींच्या संपत्तीत 4.73 अब्ज रुपयांची भर पडली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 21.7 अब्ज डॉलर इतकी आहे. ते जगातील 44 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. विप्रोच्या शेअरच्या किंमतीत मागील वर्षभरात 13.6 टक्क्यांची भर पडली आहे. यानंतर उद्य कोटक यांचा नंबर लागतो. ते कोटक महिंद्रा बॅंकेचे अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती 2.08 अब्ज डॉलरने वाढून 13.6 अब्ज डॉलरवर पोचली आहे. या यादीत पुढील क्रमांक एचसीएल टेक्नॉलॉजीसच्या शीव नाडर यांचा आहे. त्यांची संपत्ती 1.5 अब्ज डॉलरने वाढली आहे. यात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, स्री सिमेंटचे बेनू गोपाल बंगूर आणि वेदांता समूहाचे अनिल अगरवाल यांचाही समावेश आहे. या तिघांच्या संपत्तीत 1.5 अब्ज ते 1.7 अब्ज डॉलरची भर पडली आहे. आर्सेलरमित्तल समूहाचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्ती मात्र 88.1 अब्ज डॉलरची घट होऊन ती आता 12.91 अब्ज डॉलरवर पोचली आहे. लक्ष्मी मित्तल यांच्याबरोबर सन फार्माचे दिलीप संघवी आणि वाडिया समूहाचे अध्यक्ष नस्ली वाडिया यांच्या संपत्तीसुद्धा घट झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com