अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 7.2 टक्के

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

अर्थमंत्रालयाची माहिती; आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतील स्थिती 

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत 7.2 टक्के राहिला, अशी माहिती अर्थमंत्रालयाने शुक्रवारी दिली. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मान भारताने कायम राखल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे.

अर्थमंत्रालयाने वर्षअखेरचा आर्थिक आढावा घेतला आहे. अर्थमंत्रालयाने म्हटले आहे, की एप्रिल ते ऑक्‍टोबर या कालावधीत महागाई नियंत्रणात असून, किरकोळ व घाऊक चलनवाढ अनुक्रमे 5.2 टक्के व 2.7 टक्के आहे. खर्चात करण्यात आलेली कपात आणि महसूल वाढविण्यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. सहकारी आर्थिक प्रशासनासाठी प्रशासकीय उपाययोजना सुरू असून, चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यात मदत झाली आहे.

चालू आर्थिक वर्षात जागतिक पातळीवरील मंदीचे वातावरण, पेट्रोलियम उत्पादनांचे वाढते भाव हे घटक असूनही अर्थव्यवस्थेची चांगली वाढ झाली आहे. तसेच, चलनवाढही स्थिर आहे. वित्तीय तूट आणि चालू खात्यावरील तुटीमध्येही सुधारणा झाली आहे. पहिल्या सहा महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग 7.2 टक्के राहिल्याने जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मान भारताने कायम ठेवला आहे, असे अर्थमंत्रालयाने नमूद केले आहे.

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर (एप्रिल ते ऑक्‍टोबर) 
- किरकोळ चलनवाढ : 5.2 टक्के
- घाऊक चलनवाढ : 2.7 टक्के
- अन्नधान्य चलनवाढ : 6.1 टक्के
- कृषी क्षेत्राचा वाढीचा वेग : 2.5 टक्के
- उद्योग क्षेत्राचा वाढीचा वेग : 5.6 टक्के
- सेवा क्षेत्राचा वाढीचा वेग : 9.2 टक्के

Web Title: 7.2 per cent growth rate of the economy