आयडीबीआय बॅंकेमध्ये  ७४३ कोटींचा गैरव्यवहार

पीटीआय
शुक्रवार, 30 मार्च 2018

नवी दिल्ली - आयडीबीआय बॅंकेतील ७४३ कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तीन गुन्हे दाखल केले आहेत. किसान क्रेडिट कार्ड आणि मत्स्य शेती कर्जामध्ये आंध्र प्रदेशातील पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यात हे गैरव्यवहार घडले आहेत. 

‘सीबीआय’ने दाखल केलेल्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये बॅंकेचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी आर. दामोदरन, बट्टू रामा राव आणि बी. के. साहू हे आरोपी आहेत. या तिन्ही प्रकरणांमध्ये एकूण ४१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयडीबीआयच्या पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यातील पालंगी येथील शाखेत ३९४ कोटी, १६० कोटी आणि १९८ कोटी रुपयांचे हे गैरव्यवहार झाले आहेत. किसान क्रेडिट कार्ड आणि मत्स्य शेतीच्या कर्ज वितरणात हे गैरव्यवहार झाले. किसान क्रेडिट कार्डवर कर्ज देताना किमान कर्जाच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यात आले. बॅंकेने कर्ज देताना योग्य कागदपत्रे घेतली नाहीत, तसेच कर्ज देण्याआधी आणि दिल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली नाही. 

Web Title: 743 crores of fraud in IDBI Bank