
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी! DA नंतर आता हे 4 भत्ते वाढणार
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) ३ टक्के वाढ झाल्यानंतर आता पगारात बंपर वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. डीए (DA) वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक भत्त्यात वाढ होणार आहे.
डीए वाढल्याने प्रवास भत्ता (Travel Allowance) आणि सिटी अलाउंस (City Allowance) वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीही (Gratuity) आपोआप वाढतील. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढण्याची खात्री आहे.
इतकेच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ताही (TA) वाढणार आहे. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: तुमच्या PF खात्यात किती पैसे आहेत, असे तपासा
३० मार्च रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे नऊ महिन्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए दुपटीने वाढला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता 34 टक्के दराने DA आणि DR मिळेल. या घोषणेचा फायदा 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. मात्र, यामुळे सरकारवर वार्षिक 9544.50 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.
हेही वाचा: पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन लागू करा
दरम्यान, केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून थकबाकीसाठी सरकारवर सातत्याने दबाव आणला जात आहे. पगार आणि भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून तो थांबवता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीतील डीएची थकबाकी भरण्यासाठी दबाव आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएच्या थकबाकीबाबतही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
Web Title: 7th Pay Commission After Da 4 More Allowances Will Be Increased For Central Government Servant
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..