पीएमपीच्‍या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन लागू करा

पीएमपीच्‍या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन लागू करा

पुणे, ता. १६ ः पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करावा, कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, ई-तिकीट मशिनच्या तांत्रिक अडचणी दुरुस्त कराव्यात, अशा विविध मागण्या आठ युनियन एकत्रित येत स्थापन केलेल्या पीएमपी कृती समितीने शनिवारी पत्रकार परिषदेत केल्या.
यावेळी कृती समितीचे सुनील नलावडे, कैलास पासलकर, दिलीप मोहिते, महादेव रांजणे, नीलेश जगताप, दिनकर झेंडे, पुरुषोत्तम लाखवडे आदी उपस्थित होते. नलावडे म्हणाले, ‘‘कामगारांच्या मागण्यांकडे पीएमपी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पीएमपीच्या वर्धापन दिनानिमित्ताने बस डे साजरा केला जाणार आहे. यादिवशी कामगार काळ्या फिती लावून पीएमपी प्रशासनाचा निषेध करणार आहे’’.
मोहिते म्हणाले, ‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र मंजूर केलेला निधी अद्यापही दोन्ही महापालिकांना दिला नसल्यामुळे सातव्या वेतनापासून कामगार वंचित आहेत. दोन्ही पालिकांना याचा विचार करून निधी तत्काळ पीएमपीला द्यावा. कोरोनाकाळात बस सेवा बंद असताना या ठेकेदारांना ११ कोटी रुपये दिले. मात्र कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.’’ ई-मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामध्ये दुरुस्ती करण्याऐवजी तिकिटाच्या हिशोबात येणारा फरक हा वाहकाकडून वसूल केला जातो. त्यामुळे त्याला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी वाहक तणावात येऊन काम करत आहे, असे लाखवडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com