3 वर्षांत 1 लाखाचे 8 लाख, या शेअरने अतिशय कमी काळात दिला तगडा रिटर्न... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

3 वर्षांत 1 लाखाचे 8 लाख, या शेअरने अतिशय कमी काळात दिला तगडा रिटर्न...

मुंबई : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. त्याचबरोबर असे काही शेअर्स आहेत ज्यात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना संयम तितकाच गरजेचा आहे.

तुम्ही योग्य वेळी शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना अतिशय कमी काळात श्रीमंत केले आहे. हा शेअर गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे.

हेही वाचा: आयआरएफसीच्या शेअर्समध्ये 2 दिवसांत मजबूत वाढ

आम्ही गोदावरी पॉवर आणि इस्पात (GPIL) या स्टॉकबाबत बोलत आहोत. गोदावरी पॉवर ही रायपूरस्थित हीरा ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. या शेअरने मागच्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

या शेअरमध्ये तीन वर्षांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 8 लाख रुपये मिळाले असते. मंगळवारी म्हणजेच 22 नोव्हेंबर 2022 रोजी या स्टॉकची किंमत सुमारे 302 रुपये आहे. तीन वर्षांपूर्वी हा शेअर 36 रुपयांच्या आसपास होता.

सोमवारी गोदावरी पॉवर आणि इस्पातचे (GPIL) शेअर्स 312.15 रुपयांवर बंद झाले. शेअरने बीएसईवर 14.40% ने वाढून 323.80 रुपयांचा इंट्राडे उच्चांक गाठला. तर दिवसभरात किमान 18.67% वाढ नोंदवली. हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: दोन वर्षांत 376.40 रुपयांवरुन हा शेअर पोहोचला 3000 रुपयांवर, अजुनही तेजीचा कल...

गोदावरी पॉवरचे मार्केट कॅपिटल 4,399.60 कोटी रुपये आहे आणि याचे लाभांश उत्पन्न 3.5 टक्क्यांहून अधिक आहे. एकट्या FY22 मध्ये गोदावरी पॉवर आणि इस्पातने (GPIL) त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 11 रुपये दराने 220 टक्के डिव्हिडेंड दिला आहे. गेल्या वर्षी 21 नोव्हेंबरच्या हा शेअर 129 रुपयांवर होता. त्या तुलनेत या स्टॉकमध्ये आतापर्यंत तब्बल 141.86 टक्क्यांची वाढ झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock