आयआरएफसीच्या शेअर्समध्ये 2 दिवसांत मजबूत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

आयआरएफसीच्या शेअर्समध्ये 2 दिवसांत मजबूत वाढ

आयआरएफसीच्या (IRFC) शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून खरेदीचा ट्रेंड दिसत आहे. या शेअर्समध्ये अवघ्या दोन दिवसांत जवळपास 14 टक्क्यांनी तेजी दिसून आली. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे (IRFC) शेअर्स 15 नोव्हेंबरला 25.20 रुपयांवर बंद झाले.

त्यानंतर 17 नोव्हेंबरला बीएसईवर 28.70 रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचले, म्हणजे अवघ्या दोन दिवसांत हा शेअर 14 टक्क्यांनी मजबूत झाला. पण, नंतर प्रॉफिट बुकींगमुळे विक्री वाढली आणि मग 6.69 टक्क्यांनी वाढून हा शेअर 27.90 रुपयांवर बंद झाले.

हेही वाचा: 63 हजारांच्या गुंतवणुकीचे 1 कोटी, हा फार्मा शेअर अजुनही तेजीत...

पीएसयू एनबीएफसी अर्थात नॉन-बँकिंग फायनांशियल कंपनी आयआरएफसी त्याच्या गुंतवणूकदारांना0.80 पैसे प्रति इक्विटी शेअर डिव्हिडेंड देणार आहे. याची रेकॉर्ड डेट 18 नोव्हेंबर 2022 अशी निश्चित करण्यात आली होती, त्यामुळेच आयआरएफसीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

आयआरएफसीचे शेअर्स गेल्या वर्षी देशांतर्गत बाजारात लिस्ट झाले होते. गेल्या वर्षी 2021 चा हा पहिला IPO होता. याशिवाय, पहिल्यांदाच पीएसयू एनबीएफसीचा आयपीओ आला होता. 4633 कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये, गुंतवणूकदारांना 26 रुपयांच्या किंमतीला शेअर्स जारी करण्यात आले.

आयपीओ 3.49 वेळा सबस्क्राइब झाला आणि कर्मचारी कोटा 43.76 वेळा भरला गेला. पण, त्याच्या शेअर्सची सुरुवात निराशाजनक झआली. त्याचे शेअर्स सुमारे 4 टक्के सूट म्हणजेच 25 रुपयांवर लिस्ट झाले आणि पहिल्या दिवशी बीएसईवर 4.42 टक्के घसरणीने 24.85 रुपयांवर बंद झाले.

हेही वाचा: या शेअरने 1 लाखाचे केले 93 लाख, आता 400% डिव्हिडेंड देण्याची घोषणा...

आयआरएफसी ही भारतीय रेल्वेची आर्थिक शाखा आहे. ही कंपनी देशांतर्गत आणि परदेशी बाजारातून रेल्वेसाठी निधी उभारते. याशिवाय रेल्वेच्या बजेटशिवाय खर्चाचीही व्यवस्था करते. केंद्रीय मंत्रिमंडळाने पाच वर्षांपूर्वी आयआरएफसीसोबत आणखी 4 रेल्वेशी संबंधित कंपन्यांना मार्केटमध्ये लिस्टींगसाठी मंजुरी दिली होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market