esakal | आठ बँकांच्या खातेदारांनो, १ एप्रिलपासून नियम बदलणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Bank

१ एप्रिलपासून जुन्या बँकांच्या चेकबुकचा काहीही उपयोग होणार नाही.

आठ बँकांच्या खातेदारांनो, १ एप्रिलपासून नियम बदलणार!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जर तुमचं पुढे दिलेल्या बँकेत खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक ऑफ अलाहाबाद या बँकांचे अन्य बँकांमध्ये विलिनीकरण करण्यात आले. यामुळे या आठ बँकांच्या ग्राहकांचे चेकबुक, पासबुक आणि भारतीय वित्तीय सेवा कोड (IFSC) हे अवैध ठरवले जाणार आहेत. म्हणजेच १ एप्रिलपासून जुन्या बँकांच्या चेकबुकचा काहीही उपयोग होणार नाही. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे - 

चेकबुकसाठी आवश्यक माहिती
१) १ एप्रिलपासून विलीन झालेल्या बँकांची चेकबुक वैध धरली जाणार नाहीत. त्यामुळे तुमचं खातं ज्या बँकेत विलीन करण्यात आलं आहे त्या बँकेतून नवीन चेकबुक घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जुन्या बँकांच्या धनादेशाद्वारे देयके बंद केली जातील. त्यामुळे आताच नवीन बँकेतून चेकबुक बदलून घ्या.

सोन्याची किंमत पुन्हा घसरली, जाणून घ्या आजचे दर​

२) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी ३१ मार्चपर्यंत चेकबुक बदलून घ्यावीत. या दोन्ही बँकांचे पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण करण्यात आलं आहे. 

३) जर तुम्ही सिंडिकेट बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही ३० जूनपर्यंत जुन्याच चेकबुकचा उपयोग करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँकेने काही बँकांना जुन्या चेकबुकचा वापर करण्यात दोन तिमाहीपर्यंतची मुदत दिली आहे. 

४) तुमची बँक तुम्हाला किती वेळपर्यंत चेकबुक आणि पासबुक वापरण्यास परवानगी देते, यासाठी तुम्हाला वारंवार बँकेशी संपर्क साधावा लागेल. जर तुम्ही पोस्ट-डेटेड चेक दिला असेल, तर नवीन चेकबुक मिळताच तुम्हाला तो बदलावा लागेल. काही बँकांसाठी IFSC आणि MICR कोड बदलण्यात येणार आहे. 

पॅन आधारशी असं करा लिंक; उद्या शेवटचा दिवस

मनी ट्रान्सफरबाबत...
५) जर तुम्ही तुमच्या बँकेचा तपशील एखाद्यास दिला असेल किंवा देणार असाल तर तुम्हाला नव्या बँकेचा IFSC कोड द्यावा लागेल. IFSC कोड बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून शोधू शकता. 

६) मनी ट्रान्सफरच्या बाबतीतही IFSC आणि MICR कोड काही बँकांसाठी बदलतील तर काही बँकासाठी तेच राहतील. 

७) युनियन बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचे खाते क्रमांक बदलले नाहीत, पण IFSC कोड बदलण्यात येईल. प्रत्येक बँकेचे स्थलांतर वेगवेगळे असते. 

८) त्यामुळे तुमच्या बँकांनी कशात बदल केला आहे आणि कोणत्या गोष्टी तशाच ठेवल्या आहेत, याची बँकेतूनच खात्री करून घ्यावी. कर्ज, जीवन विमा आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीसारख्या देयकांसाठी ईसीएस सूचना बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! एक एप्रिलपासून लागू होणार नवे नियम? 

ठेवी आणि कर्जासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
९) विलिनीकरण झालेल्या बँकांकडून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल, तर नवी (अँकर) बँक तुमची सर्व प्रक्रिया सुसंगत करून घेईल. काही बँकांसाठी नव्या अर्टी, शर्ती असू शकतात. याबाबतची चौकशी तुम्ही तुमच्या बँकेत करू शकतात. 

१०) फिक्स डिपॉझिटचा विचार करता बँका व्याजदरात बदल करणार नाहीत, पण विलिनीकरणानंतर अँकर बँक या दरांबाबत निर्णय घेऊ शकते.

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image