esakal | सोन्याची किंमत पुन्हा घसरली, जाणून घ्या आजचे दर
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याची किंमत पुन्हा घसरली, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

सोन्याची किंमत पुन्हा घसरली, जाणून घ्या आजचे दर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सुरु असलेली घसरण आजही पाहायला मिळाली. एमसीएक्सवर मंगळवारी सोन्याच्या किंमत ०.४ टक्क्यांनी घसरून प्रति तोळा ४४ हजार ५३८ रुपये इतकी झाली आहे. त्याशिवाय चांदीच्या दरांमध्येही ०.३ टक्केंनी घसरण झाली आहे. चांदीची किंमत प्रति किलो ६३ हजार ९८५ इतकी झाली आहे. जानेवारीपासून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या वर्षभरात सोन्याच्या किंमतीत तब्बल पाच हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. कारण, गेल्या ११ महिन्यातील सोन्याची ही सर्वात निचांकी किंमत आहे. तसेच पुढील दोन महिन्यात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तण्यात आली आहे.  

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याची किंमत उच्चांकी प्रति तोळा ५७ हजार रुपयांपर्यंतच्या पोहचली होती. तेव्हापासून आजपर्यंत प्रति तोळा सोन्याच्या किंमतीमध्ये १२ हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सर्वात चांगली संधी आहे.  

हेही वाचा : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये घसरण, वाचा आजचे दर

आजचे सोन्याचे दर (Gold Price, 30 March 2021) :
दिल्लीतील सर्राफा बाजार बाजारात सोन्याच्या दरांत ०.४ टक्केंनी घसरण पाहायला मिळाले. दिल्लीमध्ये सोन्याचं दर प्रति तोळा ४४ हजार ५३८ रुपये इतके झाले आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरांत घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दर ०.४ टक्के प्रति औंसने घसरुन एक हजार ७०४ डॉलर झाले आहेत.  

चांदीची किंमत किती?
 सोन्यासह चांदीच्या किंमतीमध्येही आज घसरण पाहायला मिळाली.  दिल्लीतील सर्राफा बाजारात चांदीच्या दरांत ०.३ टक्केंनी घसर झाली. दिल्लीमध्ये चांदी प्रति किलो ६३ हजार ९८५ रुपये इतकी झाली.  

हेही वाचा : शेअर मार्केटमध्ये उसळी

सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी घसरण होणार?
तज्ज्ञांच्या रिपोर्ट्सनुसार सोन्याच्या किंमतीमध्ये सुरु असलेली घसरण लवकरच थांबू शकते. डॉलर आणि कच्च्या तेलाची घसरलेली किंमत यामुळे सध्या सोन्याची किंमत घसरली आहे. मात्र, लवकरच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं, इंधन आणि डॉलरच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते.  

कधी महागणार?
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या अंदाजानुसार, पुढील दोन महिन्यात सोन्याची किंमत प्रतितोळा ४८ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर चांदी ७२ हजारांपर्यंत पोहचू शकतं.  

loading image
go to top