Woman Millionaire : ६६१ रुपये खर्चून ५ कोटी कमवले, बायकोचा प्रताप बघून नवऱ्यालाही लागलं वेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Millionaire

Woman Millionaire : ६६१ रुपये खर्चून ५ कोटी कमवले, बायकोचा प्रताप बघून नवऱ्यालाही लागलं वेड

नशीब बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. ती बिस्किटे घेण्यासाठी बाजारात गेली होती. पण जेव्हा ती परतली तेव्हा ती 5 कोटींची मालकिन बनली होती.

अवघ्या 661 रुपये खर्चून ही महिला करोडपती झाली. अमेरिकेतील नॉर्थ कैरोलीना या राज्यातील हे प्रकरण आहे.

ही महिला बिस्किटे घेण्यासाठी बाजारात गेली होती. पण जेव्हा ती परतली तेव्हा ती 5 कोटींची मालकिन बनली होती. सुरुवातीला तिच्या पतीलाही विश्वास बसला नाही, पण जेव्हा त्याने चौकशी केली.

तेव्हा त्याला कळले की, त्याची पत्नी खरोखरच करोडपती झाली आहे. हे कळल्यानंतर दोघेही आश्चर्यचकित झाले आणि दोघांनाही खूप आनंद झाला.

'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, डोना डेंटन नावाची महिला शुक्रवारी फ्रेमोंट फूड मार्टमध्ये बिस्किट खरेदी करण्यासाठी गेली होती. पण तिथे तिने लॉटरीचे तिकीट पाहिले आणि बिस्किटासह 777 (Triple 777 Lottery) लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

डोनाने 8 डॉलर (661 रुपये) ला लॉटरीचे तिकीट खरेदी केले. मात्र, ती लॉटरी जिंकेल याची तिला कल्पनाही नव्हती. मात्र जेव्हा तिने तिकीट तपासले तेव्हा तिला धक्काच बसला. तिला 7,00,000 लाख पौंडांची (5 कोटी 78 लाख रुपये) लॉटरी लागली होती.

ती जेंव्हा घाईघाईत घरी पोहोचली आणि तिने पतीला पुन्हा तिकीट तपासायला सांगितले. तेंव्हा पतीने लॉटरी कार्यालयात संपर्क साधून क्रमांक बरोबर आहे की, नाही हे तपासले. त्यानंतर त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. सुरुवातीला त्याचाही विश्वास बसला नाही, पण डोनाने खरंच लॉटरी जिंकली होती. ती करोडपती झाली होती.

हेही वाचा: Pakistan Economy : पाकिस्तान आर्थिक संकटात; अर्थमंत्री म्हणाले, यात माझी नाही तर...

लॉटरीच्या रकमेतून कर कपात केल्यानंतर डोनाला सुमारे 4 कोटी 11 लाख रुपये मिळतील. लॉटरी जिंकल्यानंतर, डोना म्हणाली, "आमचा ख्रिसमसचा आनंद द्विगुणित झाला आहे. आम्ही खूप आनंदी आहोत." डोना तिच्या स्थानिक चर्चला काही पैसे देणार आहे असेही तिने सांगितले.