1 जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

सध्या देशात 25 कोटी लोकांकडे पॅन कार्ड आहे. तर 111 कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आलेले आहे. मात्र देशात फक्त 2.07 कोटी करदात्यांनीच त्यांचा आधार क्रमांक पॅन कार्डसोबत जोडलेला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे 1 जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत 12-अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 च्या वित्त विधेयाकामध्ये कर प्रस्तावात दुरुस्त्याद्वारे सुधारणा करून आधार अनिवार्य केले आणि यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार येत्या 1 जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आधार आणि पॅन एकमेकांशी संलग्न असणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल. प्राप्तिकर संकलन वाढवत करचुकवेगिरी करणार्‍या लोकांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे.

महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2017 पर्यंत ज्या व्यक्तीला पॅन कार्ड देण्यात आले आहे अश्या प्रत्येक व्यक्तीला  कलम 139-एएच्या उपकलम (2) च्या तरतुदींनुसार पॅन कार्ड आधार क्रमांकाची जोडणे आवश्यक आहे.

सध्या देशात 25 कोटी लोकांकडे पॅन कार्ड आहे. तर 111 कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आलेले आहे. मात्र देशात फक्त 2.07 कोटी करदात्यांनीच त्यांचा आधार क्रमांक पॅन कार्डसोबत जोडलेला आहे.

गेल्या महिन्यात ''ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे,' हा केंद्राचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम राखला होता. मात्र, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा नागरिकांनादेखील प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा अधिकार असून असे न केले नाही तरी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
या लोकांना त्रास होण्याची शक्यता

ज्या लोकांचे पॅनकार्ड आणि आधार कार्डवर नावाचे स्पेलिंग वेगवेगळे असेल. किंवा पॅनकार्ड आणि आधार कार्डवरील नावात फरक असेल अशा लोकांना पॅनकार्ड आधारकार्डशी जोडण्यास अडचण येण्याची शक्यता आहे.
 
चुकीची माहिती असल्यास सुधारणा करणे आवश्यक
आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक खात्याच्या दिलेल्या माहितीमध्ये तफावत असेल तरी देखील कार्ड लिंक करण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे. किंवा जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्यास अशा लोकांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. यामुळे आता जर तुमच्या आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक खात्याच्या दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्यास बदल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न अर्ज शकतात. हा बदल प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन देखील करता येणे शक्य आहे. आपल्या यूआयडीसोबत महत्वाचे कागदपत्र जोडुन हा बदल करता येतो. शिवाय ऑनलाईनच्या माध्यमातून देखील बदल करणे शक्य आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे
फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर!​
मुंबई: प्रकृती अस्वस्थामुळे मुस्तफा डोसा रुग्णालयात​
पुणे: आंद्रा धरणग्रस्तांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा
प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीचादेखील अर्ज​
रॅन्समवेअरचा पुन्हा हल्ला​
वसुली, पीककर्जाचा प्रश्‍न कायम
कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhaar-PAN linking must from July 1, govt notifies rules