निवृत्तिवेतनासाठी आधारसक्ती नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी आधार बंधनकारक नाही, असा खुलासा केंद्रीय मनुष्यबळमंत्री जितेंद्रसिंह यांनी मंगळवारी केला. बॅंक खात्याशी आधार जोडले नसल्याने काही निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सिंह म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी आधार बंधनकारक करण्यात आलेले नाही. सरकारने कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या आहेत. 

सरकारी कर्मचारी - ४८.४१ लाख
निवृत्त कर्मचारी  -६१.१७ लाख

Web Title: aadhar card for retirement is not compulsory