अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून ‘चार्टर्ड बाइक्स’ना वीजपुरवठा | Adani Electricity update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Electricity

अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून ‘चार्टर्ड बाइक्स’ना वीजपुरवठा

मुंबई : पवईच्या हिरानंदानी गार्डन (Powai Hiranandani garden) परिसरात सुरु झालेल्या चार्टर्ड बाईक्सच्या विजेवर (chartered bikes electricity) चालणाऱ्या दुचाकींना अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे (Adani electricity) वीजपुरवठा केला जाणार आहे. या दुचाकी प्रामुख्याने इ कॉमर्स कंपन्यांतर्फे (E-commerce company) किंवा खाद्यान्न डिलीव्हरीसाठी (food delivery) वापरल्या जातात. त्यांचा कमाल वेग ताशी 25 किलोमीटरपर्यंतच असल्याने त्या चालविण्यासाठी चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्सची (driving license) जरुरी नसते.

हेही वाचा: लसीकरण करूनही झालेला संसर्ग दिशादर्शक ठरणार; BMC कडून प्रकरणांचा अभ्यास

सध्या अशा 50 ई-बाईक्स पवई या पूर्व उपनगरात सुरु करण्यात आल्या आहेत. हिरानंदानी गार्डन्समधीलय टोरिनो टॉवरजवळ या दुचाकी असतील. त्यांच्यामुळे रहिवाशांना प्रदूषणमुक्त वाहनांचा अनुभव मिळेल. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी हे सहकार्य करण्यात आले आहे. मुंबईत विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी सर्वात जास्त पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शहरातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होईल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईचे ​​प्रवक्ते म्हणाले.

तर या सहकार्यामुळे ही विद्युत वाहने वापरण्याच्या रोजच्या खर्चात प्रत्येकी दीडशे ते दोनशे रुपयांची बचत होणार आहे. असा प्रकल्प सर्वांनाच लाभदायक असल्याने सर्वच शहरांनी याचे अनुकरण करावे, असे चार्टर्ड बाईक्सचे प्रवक्त संयम गांधी म्हणाले. चार्टर्ड बाईक्सतर्फे गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमधील अनेक शहरांमध्ये विजेवरील दुचाकी आणि बस चालविल्या जातात.

loading image
go to top