esakal | अदानी ग्रीनने मिळवले 45,000 कोटींचे कंत्राट
sakal

बोलून बातमी शोधा

adani green

अदानी ग्रीन एनर्जी ही अदानी समूहातील आघाडीची कंपनी आहे. 2025 पर्यत 25 गिगावॅट अपारंपारिक ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता गाठण्याचे अदानी ग्रीन एनर्जीचे उद्दिष्ट आहे. यासाठी पुढील पाच वर्षात ऊर्जा क्षेत्रात कंपनी 1,12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती अदानी ग्रीन एनर्जीने दिली आहे. 

अदानी ग्रीनने मिळवले 45,000 कोटींचे कंत्राट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अदानी ग्रीन एनर्जीने 45,000 कोटी रुपयांचे मॅन्युफॅक्चरिंग लिंक्ड सोलर कंत्राट एसईसीआयकडून मिळवले आहे. 8 गिगावॅटची वीजनिर्मिती क्षमता आणि 2 गिगावॅट इक्युपेमेंट उत्पादन प्रकल्प विकसित करण्यासंदर्भातील हे कंत्राट आहे. अदानी ग्रीन एनर्जी ही अदानी समूहातील आघाडीची कंपनी आहे. 2025 पर्यत 25 गिगावॅट अपारंपारिक ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता गाठण्याचे अदानी ग्रीन एनर्जीचे उद्दिष्ट आहे. यासाठी पुढील पाच वर्षात ऊर्जा क्षेत्रात कंपनी 1,12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती अदानी ग्रीन एनर्जीने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अदानी ग्रीन एनर्जी लि.ने सौरऊर्जा निर्मितीसाठी मिळवलेले हे मॅन्युफॅक्चरिंग लिंक्ड कंत्राट कोणत्याही कंपनीने यासंदर्भातील मिळवलेल्या कंत्राटापैकी पहिलेच कंत्राट आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसईसीआय) कडून अदानी ग्रीन एनर्जीने हे कंत्राट मिळवले आहे.  

सौरऊर्जेच्या संदर्भातील हे जगातील सर्वात मोठे कंत्राट ठरणार आहे. 45,000 कोटी रुपयांच्या या कंत्राटामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात 4 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. या सौरऊर्जा निर्मितीमुळे 90 कोटी टन कार्बनडाय ऑक्साईड विस्तापित करता येणार आहे. या कंत्राटामुळे अदानी ग्रीन एनर्जीकडे आता 15 गिगावॅट क्षमतेचे काम असणार आहे.

सोन्यातील गुंतवणूक, एक सोनेरी पर्याय

'आमचे हे कंत्राट देशाच्या पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भातील धोरणातील पुढचे एक पाऊल असणार आहे. त्याशिवाय आत्मनिर्भर भारतासाठीचेही एक पाऊल ठरणार आहे. आमच्या समूहाच्या राष्ट्रबांधणीच्या उद्दिष्टासंदर्भातील हे आणखी एक पाऊल ठरणार आहे', असे मत अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी व्यक्त केले आहे.

2022 पर्यत पहिली 2 गिगावॅट क्षमता कार्यान्वित होणार आहे. तर दरवर्षी 2 गिगावॅट या पद्धतीने उरलेली 6 गिगावॅट क्षमता 2025 पर्यत पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. विविध स्थानांवर हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका