Adani Group : अदानींच्या अडचणी थांबता थांबेना! आता फ्रान्सकडून बसला मोठा धक्का; कंपनीतील गुंतवणूक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Group

Adani Group : अदानींच्या अडचणी थांबता थांबेना! आता फ्रान्सकडून बसला मोठा धक्का; कंपनीतील गुंतवणूक...

Adani Share Price : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यानंतर अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली, त्यामुळे कंपन्यांचे बाजारमूल्यही लक्षणीय खाली आले.

त्याचबरोबर देशातील विरोधकही अदानी यांच्यावर गैरव्यवहाराबद्दल सतत आरोप करत आहेत. दरम्यान, अदानी समूहाला आता आणखी एक मोठा झटका बसला आहे.

यावेळी अदानी समूहाला फ्रान्सकडून धक्का बसला आहे. फ्रान्सच्या टोटल एनर्जीने अदानी समूहासोबतचा करार थांबवला आहे.

अदानी समूहाच्या सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सच्या टोटल एनर्जीने सांगितले आहे की, त्यांनी सध्यासाठी 50 अब्ज डॉलर हायड्रोजन प्रकल्पातील अदानी समूहासोबत भागीदारी थांबवली आहे.

अमेरिकन फायनान्शिअल रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने ग्रुपवर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर टोटल एनर्जीने हे पाऊल उचलले आहे.

फ्रेंच समूहाचे मुख्य कार्यकारी पॅट्रिक पौयान यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जूनमध्ये अदानी समूहासोबत भागीदारीची घोषणा करण्यात आली होती परंतु कंपनीने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही.

जून 2022 मध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार, TotalEnergies ने अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) या अदानी ग्रुप कंपनीमध्ये 25 टक्के हिस्सा घेणार होती.

ही फर्म ग्रीन हायड्रोजन वातावरणात 10 वर्षांसाठी सुमारे 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. त्याची प्रारंभिक क्षमता 2030 पूर्वी एक अब्ज टन असण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

पोयान म्हणाले, "अर्थातच, परिस्थिती आमच्यासाठी स्पष्ट होईपर्यंत हायड्रोजन प्रकल्प स्थगित ठेवण्यात आला आहे."

टोटल एनर्जीजने अदानी ग्रुपमध्ये 3.1 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे, अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांवरील ग्रुपच्या चालू ऑडिट तपासणीच्या निकालांची प्रतीक्षा करेल.