
Adani Group News : गौतम अदानी झाले कर्जबाजारी? 'या' तीन कंपन्यांचे शेअर्स ठेवले तारण
Adani Group Firms Pledge Shares : अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनेक दिवसांपासून प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आजही त्यांच्या शेअर्समध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.
अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स ठेवले तारण :
अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI) अतिरिक्त शेअर्स गहाण ठेवले आहेत.
काही दिवसांपूर्वी, अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने अदानीवर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर, त्यांच्या बाजार मूल्यात सुमारे 120 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. तेव्हापासून गुंतवणूकदारांमध्ये समूहाच्या कंपन्यांबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अदानीच्या तीन कंपन्यांचे शेअर्स एसबीआय (SBI) कॅप ट्रस्टी कंपनीकडे तारण :
कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समूह कंपन्यांनी - अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ), अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी यांनी त्यांचे शेअर्स SBI कॅप ट्रस्टी कंपनीकडे गहाण ठेवले आहेत.
अदानीच्या कंपन्यांचे किती शेअर्स तारण ठेवले आहेत- जाणून घ्या
माहितीनुसार, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) चे आणखी 75 लाख शेअर्स तारण ठेवण्यात आले आहेत, त्यानंतर त्या सर्व शेअर्सपैकी एक टक्का SBI कॅपकडे तारण ठेवण्यात आले आहे.
तर, अदानी ग्रीनचे अतिरिक्त 60 लाख शेअर्स गहाण ठेवल्यानंतर, SBI कॅपने कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी 1.06 टक्के शेअर्स तारण ठेवले आहेत, तर अदानी ट्रान्समिशनचे आणखी 13 लाख शेअर्स तारण ठेवल्यानंतर त्या एकूण शेअर्सपैकी 0.55 टक्के शेअर्स तारण ठेवले आहेत.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
सर्वोच्च न्यायालयाने अदानी प्रकरणावर सुनावणी करताना भारतीय गुंतवणूकदारांच्या नुकसानावर चिंता व्यक्त केली आहे.
नियामक यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आणि भारतीय गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्याच्या उपायांवर न्यायालयाने केंद्र सरकार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांचे मत मागवले. या दोघांनाही आपली बाजू मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.