esakal | आदित्य पुरींनी 25 वर्षांनंतर HDFC बँकेला दिला निरोप, जगदीशन यांच्याकडे धुरा
sakal

बोलून बातमी शोधा

aditya puri.jpg

आयसीआयसीआय बँकेनेही आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन आदित्य पुरी यांना शुभेच्छा दिल्या.

आदित्य पुरींनी 25 वर्षांनंतर HDFC बँकेला दिला निरोप, जगदीशन यांच्याकडे धुरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- एचडीएफसी (HDFC) बँकेत सुमारे 25 वर्षे महत्वाची जबाबदारी सांभाळणारे आदित्य पुरी यांनी शशिधरन जगदीशन यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. जगदीशन यांना बँकेचे एमडी आणि सीईओपदी नियुक्त करण्यात आले आहे. आदित्य पुरी यांनी 25 वर्षांच्या एचडीएफसीमधील प्रवासामध्ये अनेक महत्वाच्या जबाबदारी सांभाळल्या. 

आदित्य पुरी आणि जगदीशन यांनी आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने संबोधित केले. यावेळी पुरी यांनी बँकेतील 25 वर्षांच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, पुरी यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम मागील 25 दिवसांपासून सुरु होता. शनिवारी यासाठी 90 मिनिटांच्या व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बँकेचे सुमारे 1 लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. 

हेही वाचा- corona update: तीन महिन्यानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद; महामारीचा वेग मंदावला

दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन आदित्य पुरी यांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही अनेक दशकांच्या आपल्या कार्यकाळात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहात. आम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे टि्वट त्यांनी केले आहे.  

हेही वाचा- मुंबई हल्ल्यातील दोषी डेव्हिड हेडली करणार पाकिस्तानची पोलखोल

आदित्य पुरी हे भारतातील सर्वाधिक वेतन घेणारे बँकर होते. मागील आर्थिक वर्षांत आदित्य पुरी यांचे वेतन आणि इतर लाभ 38 टक्क्यांनी वाढून 18.92 कोटी रुपयांवर पोहोचले होते. त्याचबरोबर वार्षिक अहवालानुसार, मागील आर्थिक वर्षात आदित्य पुरी यांनी शेअर ऑपश्नसचा वापर केल्यामुळे 161.56 कोटी अतिरिक्त मिळाले होते. 
 

loading image
go to top