
म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...
Investment in Mutual Fund: आताच्या काळात 100 रुपयांमध्ये काय येते याचा जरा विचार करा? ज्या वेगाने महागाई वाढतेय, त्या वेगाने 100 रुपये कमी वाटतात. पण याच 100 रुपयांनी तुम्ही करोडो रुपये कमवू शकता. होय, तुम्हाला खोटं वाटतंय का ? पण तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल कारण आम्ही म्युच्युअल फंडाबद्दल बोलत आहोत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते. SIP मध्ये गुंतवणूक फक्त 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते. याला मायक्रो एसआयपी म्हणतात.
तुम्ही गुंतवणूक कशी करू शकता?
तुम्हाला एका वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. मायक्रो-एसआयपीमध्ये दरमहा फक्त 100 रुपयांची छोटीशी गुंतवणूकही तुम्हाला दीर्घकाळासाठी लाखोंचा निधी देऊ शकते.
हेही वाचा: या स्मॉलकॅप स्टॉकचा 1 वर्षात 1846% परतावा, रेकॉर्ड डेटपूर्वी अपर सर्किटला धडक
जर तुम्ही दर महिन्याला 100 रुपयांची मायक्रो-एसआयपी केली तर तुम्ही वर्षभरात 1200 रुपये जमा कराल. म्हणजेच येत्या 20 वर्षात या फंडावर नजर टाकली तर तुमची ठेव 24000 रुपये होईल. दुसरीकडे, जर तुम्हाला दरवर्षी 12 टक्के परतावा मिळत असेल, तर तुमचा 98,925 रुपयांचा निधी तयार होईल. 30 वर्षांनंतर ते सुमारे 3.5 लाख रुपये होईल. 50 वर्षात पाहिल्यास ते 39 लाखांपर्यंत पोहोचेल.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?
या गुंतवणुकीसाठी तुम्हाला कोणत्याही पॅनची गरज भासणार नाही. गुंतवणुकीसाठी तुम्हाला फक्त नाव आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Start Investing In Mutual Funds From 100 Rs And Get Big Profit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..