समाधानकारक निकालांनंतर ‘रिलायन्स’च्या शेअरमध्ये घसरण का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज(मंगळवार) इंट्राडे व्यवहारात 3 टक्क्यांनी कोसळला आहे. कंपनीने समाधानकारक आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मात्र, कंपनीमार्फत रिलायन्स जियोमध्ये केल्या जाणाऱ्या आक्रमक गुंतवणूकीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

कंपनीने रिलायन्स जियोमध्ये 8.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. याशिवाय, आणखी 4.4 अब्ज डॉलर गुंतवणूकीची कंपनीची योजना आहे, असे जेफरीज् या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकेने म्हटले आहे. रिलायन्स जियोवर होणारा भांडवली खर्च चिंताजनक असल्याचे नोमुराने म्हटले आहे.

मुंबई शेअर बाजारात रिलायन्स जियोचा शेअर आज(मंगळवार) 1068.20 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 1045.05 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 1074.70 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 51 मिनिटे) 1047.90 रुपयांवर व्यवहार करत असून 29.10 रुपये अर्थात 2.70 टक्क्यांनी घसरला आहे.

Web Title: After falling to a satisfactory outcome of the 'reliance' of shares?